मुंबईतील 3 हॉटेलमध्ये फिरवण्याचा त्रास शहाजीबापूंनी बोलून दाखवला | मग भाजपने 3 राज्यातील हॉटेलमध्ये फिरवल्याची मज्जा सांगितली

MLA Shahajibapu Patil | पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने मंत्री संदीपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या सभेत गुवाहाटीफेम शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनी काय गुन्हा केला, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, आताही शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे.
महाविकास आघाडी :
महाविकास आघाडीसरकार स्थापन होण्यापूर्वी आपल्याला मुंबईतील तीन हॉटेलमध्ये वारंवार शिफ्ट करण्यात आल्याने खूप त्रास झाल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत तीन राज्यातील हॉटेलमधले अनुभव अगदी मजेदारपणे उपस्थितांना सांगितले. विशेष म्हणजे शिंदे नव्हे तर आम्ही सर्व आमदार शिंदेंना गुवाहाटीला घेऊन गेलो होतो असा हास्यास्पद दावा त्यांनी केला. म्हणजे शिंदे ३९ आमदारांच्या सोबत घेऊन जातील तिकडे जातं होते आणि ३९ आमदार हे भाजप मोदी शहांच्या संपर्कात होते असा गंभीर प्रश्न सुद्धा त्यांच्या त्या दाव्याने उपस्थित होऊ शकतो.
उद्धव ठाकरेंवर टीका :
सूरत आणि गुवाहाटीला एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गेले नव्हते. तर आम्ही सगळे आमदार त्यांना घेऊन गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शिवसेनेच्या आमदारांची कोणतीही कामे झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आम्हीच एकनाथ शिंदेंना घेऊन गेलो. जर आत्ता गेलो नाही तर शिवसेना राहणार नाही, असे आमदारांनी त्यांना सांगितले होते. पुढच्या निवडणुकीत १० आमदार येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंसोबत ४ बैठका झाल्या, आम्ही प्रश्न मांडले मात्र त्यावर उपाय निघाला नाही, असेही शहाजीबापू म्हणाले.
शिंदेंची सुप्रिया सुळे नई अजित पवारांवर टीका :
सतत सोबत असणाऱ्या कॅमेरामनवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा काढला. तर खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री पाहिजे म्हणत शिंदेंना थेट डिवचलं. या विधानांवर एकनाथ शिंदे काय म्हणणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठणमध्ये झालेल्या सभेत मौन सोडलं. शिंदेंनी अजित पवारांबरोबरच सुप्रिया सुळेंवरही शाब्दिक वार केला.
काही लोक म्हणतात की, दोन मुख्यमंत्री पाहिजेत. काही जण सांगतात, फोटोग्राफर घेऊन जातात. मला कधीच सवय नाहीये. मी कधीच असं केलेलं नाही. जिथे कॅमेरे घेऊन जाता येतात, अशाच ठिकाणी आम्ही जातो. बाकी लोक कुठे जातात मला माहिती नाही. त्यामुळे त्यांचं त्यांना माहितीये”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MLA Shahajibapu Patil speech at Aurangabad Paithan check details 12 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं