Bigg Boss 16 | 'या' प्रसिद्ध अभिनेत्यांनी नाकारल्या बीग बॉसच्या ऑफर, कारण जाणून व्हाल थक्क

Bigg Boss 16 | रिअॅलिटी शो मधून तुम्ही खुप पॉप्यूलर होता, तुम्हाला बॉलिवूडमधून कोणत्याही प्रकारची ऑफर येऊ शकते. या शोमध्ये येण्यासाठी सेलेब्स कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार असतात. मात्र असे काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांना खुपदा बीग बॉसची ऑफर आली आहे पण त्यांनी कधीही ती ऑफर अॅक्सेप्ट केलेली नाहीये.
शिवांगी जोशी:
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी ये रिश्ता क्या कहता है मालिकेमध्ये दिसून आली होती. या अभिनेत्रीला आपण खतरों के खिलाडी सारख्या शोमध्ये पाहिले आहे परंतु ती प्रत्येक वेळी बिग बॉसची ऑफर नाकारत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर शिवांगीला बिग बॉस शोमध्ये जायचे नाही.
विवियन डिसेना:
टीव्ही अभिनेता विवियन डिसेना यालाही बिग बॉसची ऑफर देण्यात आली होती. यावेळी त्याने सांगितले की, तो एका दिवसापेक्षा जास्त काळ तिथे टिकू शकत नाही त्यामुळे मी शोमध्ये सहभागी होत नाही.
जेनिफर विंगेट:
कोणालाही जेनिफर विंगेटची ओळख करून देण्याची गरज नाहीये. तिची कारकिर्द सर्व गोष्टी बोलून जाते आणि याच कारणामुळे बिग बॉस दरवर्षी तिला शोमध्ये येण्याची ऑफर देते, पण जेनिफर दरवर्षी ऑफर नाकारते.
अर्जुन बिजलानी:
अर्जुन बिजलानी हा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तो मोठ मोठे टीव्ही शो होस्ट देखील करताना आपल्याला दिसून येतो. त्याला बिग बॉसच्या घरात येण्याची आमंत्रणे देखील अनेकदा आली आहेत, परंतु प्रत्येक वेळी अर्जुन ही संधी नाकारतो आणि म्हणतो की तो खूप व्यस्त आहे त्यामुळे त्याच्याकडे शोमध्ये येण्यासाठी वेळ नाही.
दिव्यांका त्रिपाठी:
दिव्यांका त्रिपाठी सध्या कोणत्याही शोमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दिव्यांका ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, त्यामुळे दरवर्षी तिला बिग बॉसमध्ये येण्याचे आमंत्रण मिळते, परंतु प्रत्येक वेळी प्रमाणेच या वेळीही तिने ही ऑफर नाकारली आहे.
नेहा धुपिया:
होय… हे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण नेहा धुपियालाही या शोसाठी ऑफर देण्यात आली आहे. पण नेहाने शोमध्ये जाण्यास नकार दिला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: These actors rejected Big Boss offers Checks details 13 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं