इंदिरा गांधींनी पाकिस्तानविरुद्ध १९७१ मध्ये दाखवलेलं धाडस नरेंद्र मोदी दाखवतील का? सविस्तर

पुलावामा: राष्ट्रीय संकट आणि त्यावर राजकीय इच्छ शक्तीतून मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पाकिस्तानविरुद्ध थेट युद्ध पुकारून जे अभ्यासपूर्ण धाडस दाखवलं ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या पिढीवर समाज माध्यमांच्या आधारे अनेक चुकीच्या आणि खोट्या गोष्टी दुय्यम मार्केटिंगच्या आधारे लादल्याचे सहज निदर्शनास येते. पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्लात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या मागणीने जोर धरला.
देश राष्ट्रीय संकटात असताना दिवंगत इंदिरा गांधी या भाषणं करण्यात मग्न नव्हत्या आणि दुसऱ्या बाजूला पुलवामा म्हणजे देशावर आलेले संकट असं सांगत देशातील विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. दरम्यान, संपूर्ण देशातील विरोधक दिल्लीत बैठकीला एकवटले असताना देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय संकटावर बैठक बोलावून यवतमाळमध्ये लष्कराच्या नावाने प्रचार करण्यात व्यस्त होते. ज्या दिवशी पुलवामामध्ये जवानांवर हल्ला झाला तेव्हा घटनेच्या काही तासानंतर देखील भाजपचे देशातील वरिष्ठ प्रमुख नेते प्रचार सभांमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं, तसेच ‘दिल्लीत तातडीची बैठक’ अशा नावाने बातम्या पेरून मूळ हल्ल्याच्या दुसऱ्यादिवशी सत्ताधाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावरून सरकारला किती गांभीर्य होते याचा प्रत्यय सामान्यांना आला.
मात्र विरोधकांचे खोटे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची दैनंदिन भूमिका सत्ताधाऱ्यांचे समर्थक चोख बजावत असल्याचं दिसलं. एकूणच भारतीय लष्कराने २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला ‘मोदींचा मास्टरस्ट्रोक’ असं म्हणत स्वतःचा प्रचार केला. आता २०१७ नंतर पुलवामा येथे भारतीय जवानांवर २०१९ मध्ये पुन्हा हल्ला होताच ‘लष्कर ठरवेल’ असा प्रचार सुरू केला आहे. कदाचित तसंच भारतीय लष्कराने उत्तर दिल्यास पुन्हा मोदी स्वतःच मार्केटिंग करतील यात जराही शंका नाही. परंतु, पाकिस्तान विरुद्ध जे धाडस आणि आंतरराष्ट्रीय कूटनीतीचं उदाहरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी समोर ठेऊन पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही अशी अद्दल घडवली होती, ती अद्दल नरेंद्र मोदी पाकिस्तानला कधी घडवू शकतील का? असा प्रश्न उपस्थित होतो.
१९७१ नोव्हेंबरपर्यंत युद्धाची शक्यता अटळ झाली. भारताने पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य जमा केले. पावसानंतरच्या काळात जमीन बर्यापैकी कोरडी झाली होती. तसेच हिमालयात थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यता कमी झाली. २३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार रहाण्याचे देशवासीयांना आवाहन केले. रविवार डिसेंबर ३ रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याचे पाकिस्तानी तंत्र होते. पाकिस्तानने हल्ला तर केला परंतु त्यात त्यांचा फारसा फायदा झाला नाही, उलट भारताला आक्रमण करायला सबळ कारण मिळाले व दुसर्या दिवशीच इंदिरा गांधींनी भारतीय सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करायचे आदेश दिले आणि भारताने औपचारिकरित्या युध्दाची घोषणा केली .
भारतीय आक्रमणाचे दोन उदिष्टे होती. त्यात पाहिलं म्हणजे पूर्व पाकिस्तानात जास्तीत जास्त आत घुसून पूर्व पाकिस्तानचा ताबा मिळवणे. दुसरं पश्चिम सीमेवर पश्चिम पाकिस्तानातून येणार्या पाकिस्तानी फौजेला फक्त रोखून धरायचे. पश्चिम पाकिस्तानात घुसून कोणत्याही परिस्थितीत आक्रमण करायचे नाही असा भारताचा बेत होता.
याउलट पाकिस्तानी सेनेची उदिष्टे होती. एक म्हणजे भारताला पूर्व पाकिस्तानात घुसण्यापासून रोखणे. पूर्व पाकिस्तानात आत खोलवर घुसणे बरेच अवघड होते व भारतीय सेनेला त्यात जास्तीत जास्त वेळ लागेल असे पहाणे. दुसरं म्हणजे, त्या दरम्यान पश्चिमेकडून भारतात घुसून जास्ती जास्त भूक्षेत्राचा ताबा मिळवणे. भारताने पश्चिम सीमेवर त्यामानाने कमी सैन्य तैनात केले होते. त्यामुळे त्यात पाकिस्तानी सेनेला यश मिळेल असा विश्वास होता. या दोन्हीत यशस्वी झाल्यावर भारताची कोंडी होईल अशी पाकिस्तानी लष्कराची चाल होती.
पाकिस्तानने पहिले आक्रमण करून युद्धाची सुरुवात केली खरी परंतु त्यांना त्याचा संवेग राखता आला नाही. पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी लष्कराने भारतात अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सेनेपुढे त्याचे काही एक चालले नाही. त्यातील एका पुढे प्रसिद्ध झालेल्या लोंगेवालाच्या लढाईत त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. केवळ १२० भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. सकाळ होताच भारतीय हवाई हल्यात पाकिस्तानी रणगाडे तुकडीचे जबरदस्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले. अशा रीतीने पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळीत करण्यात अपयश आले. याउलट भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण १४,००० चौ.किलोमीटर इतका मोठा भूभाग काबीज केला. हा सर्व भाग नंतर सिमला कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला.
भारतीय वायुसेनेने या युद्धात जबरदस्त कामगिरी नोंदवली. ऑपरेशन पायथॉन या नावाखाली भारतीय नौदल व हवाईदलाने अमेरिकन पद्धतीप्रमाणे विमानवाहक युद्धनौकांचा वापर करून पूर्व पाकिस्तानात चितगाव येथील पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केला.. या युद्धात भारताने हवाई दलाच्या विमानांची एकूण ४,००० उड्डाणे केली. त्यांना पाकिस्तानी हवाईदलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. पश्चिमेकडे भारतीय नौदलाने कराची बंदराची कोंडी केली व त्याबरोबरच दोन पाकिस्तानी विनाशिका बुडवल्या.
भारतीय पायदळाने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठ्या प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली. यामध्ये पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावे लागले. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने डाक्का शहर काबीज केले. ९०,००० हून अधिक पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी झाले. डिसेंबर १६ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली. दुसर्या दिवशी पाकिस्तान सरकारनेही शरणागती पत्करली.
अमेरिका पहिल्यापासूनच पाकिस्तानचा मित्रदेश होता व भारताने सोविएत संघाशी मैत्रीचा करार केल्याने भारत आता त्याच्या शत्रुपक्षात गेला. भारताने जर पाकिस्तानवर विजय मिळवला व पाकिस्तानवर कब्जा मिळवला तर अमेरिकेचा दक्षिण अशियामध्ये प्रभाव कमी होऊन सोव्हिएट प्रभाव वाढेल असा कयास होता. म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला सर्व आघाड्यांवर मदत केली. अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीला यु.एस.एस. एंटरप्राईझ ही विमानवाहू नौका बंगालच्या उपसागरात पाठवली. रशियानेही दोन युद्धनौका भारताच्या मदतीला व्हलाडिओस्टॉकयेथून पाठवल्या व अमेरिका अण्वस्त्रांची चाल चालवणार नाही ही काळजी घेतली. भारतानेदेखील अमेरिकेच्या भावना लक्षात घेऊन पश्चिम पाकिस्तानात फारसा रस दाखवला नाही. सोव्हिएट संघाने बांगलादेशी स्वातंत्र्यलढ्याला मान्यता देऊन एक प्रकारे भारतीय आक्रमणाला मान्यता दिली.
भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. हा पराभव पाकिस्तानला चटका लावून गेला व भारताने आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी पाकिस्तानी जनमानसात अजूनही भावना आहे. याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. जानेवारी १० १९७२ रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले. भारताचे जवळपास ४, ००० सैनिक या युद्धात कामी आले. पाकिस्तानच्या मृत सैनिकांची संख्या आजही निश्चित नाही. भारताने पाकिस्तानचे ९०,००० पेक्षा अधिक सैनिक व समर्थक युद्धबंदी बनवले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं