भारतीय हॅकर्स जाम भारी! पाकिस्तानच्या तब्बल २०० वेबसाईट्स हॅक

पुलवामा : पुलवाम येथे CRPFच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना सर्वच भारतीयांच्या मनात घर करून राहिली आहे. त्यामुळे संतापलेल्या भारतीय हॅकर्सने पाकिस्तानवर सायबर हल्लाच चढवला आहे. भारतीय हॅकर्सने पाकिस्तानमधील तब्बल २०० वेबसाईट्स हॅक केल्या असून त्यात सर्वाधिक भरणा हा सरकारी वेबसाईट्सचा आहे. भारतामधील ‘टीम आय क्रू’ या गटाने हा सायबर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. हॅक झालेल्या साईट्सवर या गटाचे नाव झळकताना दिसले तसेच काही वेबसाईट्स वर लढाऊ विमानातून तिरंगी धूर येताना दिसत होता.
दरम्यान, पाकिस्तानवर झालेला हा इतिहासातील सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचं बोललं जात आहे. हॅक केलेल्या वेबसाईट्सची यादीच समाज माध्यमांवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानमधील काही सरकारी वेबसाईट्सचाही समावेश आहे. हॅक केलेल्या वेबसाईटवर भारतीय हॅकर्सने, ‘आम्ही १४/०२/२०१९ कधीही विसरणार नाही’, ‘पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना समर्पित’ अशा प्रकारचे संदेश पोस्ट केले आहेत. तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे मेसेजेसही या वेबसाइटवर हॅकर्सने पोस्ट केले आहेत.
हॅक झालेल्या पाकिस्तानमधील काही वेबसाईट्स खालील प्रमाणे
- https://sindhforests.gov.pk/op.html
- https://mail.sindhforests.gov.pk/op.html
- https://pkha.gov.pk/op.html
- https://ebidding.pkha.gov.pk/op.html
- https://mail.pkha.gov.pk/op.html
- http://kda.gkp.pk/op.html
- http://blog.kda.gkp.pk/op.html
- http://mail.kda.gkp.pk/op.html
- https://kpsports.gov.pk/op.html
- https://mail.kpsports.gov.pk/op.html
- http://seismic.pmd.gov.pk/op.html
- http://namc.pmd.gov.pk/op.html
- http://rmcpunjab.pmd.gov.pk/FlightsChartFolder/op.html
- http://ffd.pmd.gov.pk/modis/op.html
- http://radar.pmd.gov.pk/islamabad/op.html
- https://badin.opf.edu.pk/14-02-2019.php
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं