Post office e-Passbook| पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये ई-पासबुक सुविधा सुरू, पोस्ट ऑफिसमध्ये न जाता तुमचे खाते तपासा

Post office e-Passbook | तुम्ही पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीमचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या खातेदारांसाठी ई-पासबुक सेवा लाँच करण्यात आली आहे. या सुविधेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या खात्याची माहिती तपासू शकता. तुमच्या खात्याची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगची गरज नाही. तुम्ही पोस्टच्या ई-पासबुक सुविधेचा वापर करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल फोन वापरू शकतात. ही सेवा मोफत खातेधारकाना उपलब्ध करून दिली जाईल.
12 ऑक्टोबर 2022 रोजी पोस्ट विभागाने अधिसूचनेद्वारे माहिती दिली आहे की, “ इंडिया पोस्ट ऑफीसने ई-पासबुक सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 12.10.2022 पासून ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ग्राहकांना सोपी आणि सुविधाजनक प्रगत डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे.” आपण ई-पासबुक सुविधेचा वापर कसा करू शकतो आणि त्यामध्ये कोणत्या सेवा उपलब्ध आहेत हे आम्ही येथे स्पष्ट केले आहे.
ई-पासबुक सुविधेबद्दल थोडक्यात :
ई-पासबुक सुविधेची काही खास वैशष्ट्ये म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम किंवा व्यवहाराची माहिती जाणून घेण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये भेट देण्याची गरज नाही. तुम्ही कधीही, कुठेही, कोणत्याही ठिकाणी तुमची पोस्ट खात्याची माहिती तपासू शकता. ही सुविधा विनामूल्य असेल. या सुविधेत तुम्हाला वेगळ्या इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग ॲप वापरण्याचीही गरज नाही.
मिनी स्टेटमेंट सुविधा :
मिनी स्टेटमेंट सुविधा सुरुवातीला POSA स्कीम, सुकन्या समृद्धी योजना खाते/SSA आणि भविष्य निर्वाह निधी खाती/PPF यासाठी उपलब्ध करून दिली जाईल आणि नंतर हळूहळू ही सुविधा लागू केली जाईल. मिनी स्टेटमेंट मध्ये तुमचे सर्वात नवीनतम 10 व्यवहारांचे तपशील दाखवले जाईल. आणि हे तुम्ही PDF फॉरमॅटमध्ये डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्ही एका ठराविक कालावधीचे अकाउंट डिटेल तपासू शकता.
ई-पासबुक : पीपीएफ, बचत खाते, सुकन्या समृद्धी खात्याची शिल्लक अशा प्रकारे तपासू शकता :
* सर्वप्रथम http://www.indiapost.gov.in किंवा http://www.ippbonline.com वेबसाईट वर भेट द्या.
* वेबसाईट ई-पासबुक लिंकवर क्लिक करा. त्याची थेट लिंक खाली दिली आहे- https://posbseva.ippbonline.com/indiapost/signin
* मोबाइल नंबर आणि कॅप्चा नीट भरा. त्यानंतर लॉगिन करा. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल, तो नीट भरा, आणि सबमिट वर क्लिक करा.
* त्यानंतर ई-पासबुक पर्याय निवडा. योजनेचा प्रकार निवडा. खाते क्रमांक नीट भरा, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. Continue पर्यायावर क्लिक करून OTP टाका. त्यानंतर Verify पर्यायावर क्लिक करा.
* आता तुमच्या समोर तीन पर्याय असतील. बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि फुल स्टेटमेंट. तुमच्या गरजेनुसार योग्य पर्यायावर क्लिक करून तुमच्या खात्याचे तपशील तपासा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Post office e-passbook online facility has been started by India post department 14 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं