Child Bank Account | या दिवाळीला तुमच्या मुलांना स्पेशल बॅंक अकाउंट करा गिफ्ट, पालक म्हणून इतर आर्थिक फायदे सुद्धा मिळवा

Child Bank Account | सध्याच्या आधूनिक युगात प्रत्येक लहान मुलाच्या हातात स्मार्ट फोन आहे. तर आताच्या लहान मुलांना एखादे खेळणे आणून दिले तर त्याचे त्यांना काहीच नवल वाटत नाही. प्रत्येक शालेय मुलांना देखील आई बाबा खाऊसाठी ठरावीक पॉकेट मनी देतात. याची सेवींग व्हावी म्हणून अनेक लहान मुलं पीगी बँक सारख्या वस्तूंमध्ये त्यांची सेवींग करत असतात. मात्र अता लहान मुलांना देखी बॅंकेत खाते खोलून त्यात सेवींग करता येणार आहे. यात त्यांना एटीएम कार्डची देखील सुविधा दिलेली आहे.
एसबीआय बॅंकेने लहान मुलांसाठी स्पेशल फिचर असलेले खाते सुरू केले आहे. याचा फायदा सर्वच लहान मुले घेऊ शकतात. यात त्यांना यूपीआयची देखील सुविधा आहे. तसेच या खात्यात किती रक्कम ठेवावी याचे देखील आकडे छोटे आहेत. त्यामुळे तुमची लहान मुलं या अकाउंटमधील पैशे विनाकारण खर्च करू शकणार नाहीत . तसेच त्यांच्या खर्चाचे सर्व तपशीलही तुम्हाला पाहता येतील. त्यामुळे या दिवाळीला भेट म्हणून तुम्ही तुमच्या लहान मुलांना हे खाते गिफ्ट करू शकता.
एसबीआय देते यावर स्पेशल बेनिफीट
एसबीआय अल्पवहीन मुलांसाठी हे फिचर आकाउंट घेउन आले आहे. यात तुमच्या मुलाच्या वयानुसार दोन पर्याय खाती आहेत. पहिले खाते पहला कदम या नावाचे आहे. तर दुसरे खाते पहली उडान या नावाचे आहे. हे दोन्ही खाते तुमच्या मुलाच्या वयानुसार निवडता येतील.
पहला कदम खात्याचे वैशिष्ट्य
हे खाते फक्त अल्पवयीन मुलांसाठी आहे. यात तुम्ही तुमच्या मुलाबरोबर जॉइंड अकाउंट खोलू शकता. किंवा त्याचे स्वत:चे वेगळे खाते खोलू शकता. यासाठी वयाची अट नाही. कोणत्याही वयातील अल्पवयीन मुलं यासाठी पात्र आहेत. हे खाते खोलल्यावर तुम्हाला एटीएम कार्ड दिले जाते. तसेच यातून यूपीआय मार्फत नेट बॅंकींगचीही सुविधा आहे. यात दररोज २००० रुपयांपर्यतच व्यवहार होऊ शकतात. तसेच ५००० रुपये या खात्यात ठेवले जाऊ शकतात.
पहली उडान खात्याची वैशिष्ट्ये
हे खाते फक्त १० वर्षांवरील अल्पवयीन मुलेच खोलू शकतात. यात साइन करणे आवश्यक आहे. तसेच याचे अपडेटचे पर्याय इतके सोपे आहेत की, तुमची मुलं स्वत:च ते करू शकतात. यात देखील नेट बॅंकींग, मोबाइल बॅंकींग आणि एटीएमची सुविधा आहे. तसेच दररोज यात २००० रुपयांपर्यंत व्यवहार करता येतील आणि ५००० रुपयांपर्यंतची रक्कम ठेवता येईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Pehla Kadam and Pehli Udaan Child Bank Account Now even minors will get an ATM card check details 25 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं