SBI Mutual Fund | ही SBI म्युच्युअल फंड योजना पैसा 8 पटीने वाढवते आहे, तुम्ही गुंतवणूक करून श्रीमंत होणार का?

SBI Mutual Fund | आजकाल शेअर मार्केट अस्थिर आहे, म्हणून लोकांनी म्युच्युअल फंडात दीर्घकाळ पैसे गुंतवायला सुरुवात केली आहे. म्युचुअल फंड आणि SIP ची लोकप्रियता सतत वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मागील काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. एसबीआय स्मॉल कॅप फंड हा असाच अप्रतिम परतावा कमवून देणारा म्युचुअल फंड आहे. व्हॅल्यू रिसर्चने या म्युचुअल फंडाला 4 स्टार आणि मॉर्निंगस्टारने 5 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा म्युचुअल फंड 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू करण्यात आला होता. 30 सप्टेंबर 2022 रोजी SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट-ग्रोथची AUM क्षमता 14,494 कोटी रुपये होती, आणि 25 ऑक्टोबर 2022 रोजी त्याची NAV 128.14 रुपये होती.
हा म्युचुअल फंड प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअर्स पैसे लावतो. याशिवाय, या म्युचुअल फंडच्या माध्यमातून लार्ज कॅप, मिड-कॅप कंपन्यांमध्ये तसेच कर्ज रोखे आणि मनी मार्केट पर्यायमध्ये गुंतवणूक केली जाते. मागील 12 वर्षांत या म्युचुअल फंड स्कीमने आपल्या गुंतवणूकदारांना 20.46 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. SBI स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना चक्रवाढ वार्षिक सरासरी वाढीच्या आधारावर एका वर्षात 13.87 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा BSE Sensex index च्या तुलनेत अधिक होता. BSE सेन्सेक्स TRI ने मागील एका वर्षात लोकांना 1.64 टक्के परतावा कमावून दिला होता.
5 वर्षात 18.15 टक्के परतावा :
एसबीआय स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत लोकांना गुंतवणुकीवर 29.71 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या दरम्यानच्या काळात S&P BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्स TRI मध्ये फक्त 26.34 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. BSE सेन्सेक्स TRI ने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 15.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांच्या काळात SBI Small cap म्युचुअल फंड ने S&P BSE 250 Small Cap Index TRI आणि BSE सेन्सेक्स TRI च्या तुलनेत अधिक परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्सने लोकांना 10.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. BSE सेन्सेक्स TRI मध्ये सरासरी वार्षिक 14.22 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, एसबीआय स्मॉल कॅप म्युचुअल फंडचा परतावा मागील पाच वर्षांत वार्षिक सरासरी 18.15 टक्के होता.
गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही 1 वर्षापूर्वी या म्युचुअल फंडात SIP पद्धतीने 10,000 रुपये गुंतवले असते, तर आता तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 11,387 झाले असते. त्याचप्रमाणे, 3 वर्षांपूर्वी, जर तुम्ही या म्युचुअल फंडात दर महिन्याला SIP पद्धतीने 10,000 रुपये गुंतवले असते, तर आता तुमची गुंतवणूक दुप्पट होऊन 21838.95 रुपये झाली असती. जर 5 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात तुम्ही 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23046.59 रुपये झाले असते. जर 12 वर्षांपूर्वी तुम्ही या म्युचुअल फंडात 10,000 रुपये गुंतवले असते तर आता तुम्हाला 11,3791 रुपये मिळाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| SBI Mutual Fund scheme for Investment in Small cap and mid cap Shares for Huge return on investment on 28 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं