Salary Protection Insurance | तुमच्या पश्चातही कुटूंबातील प्रियजणांना मिळेल पगार, वाचा पगार संरक्षण विम्याचे फायदे

Salary Protection Insurance | घरात एकटा कमावता व्यक्ती असल्यास सर्व घर त्याच्या पगारावर चालते. यात आपल्याला काही झाले तर आपले कुटूंब कसे चालनार असा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल. घरात एकच व्यक्ती कमावत असेल तर तिच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यावर ते कुटूंब आर्थिक विवंचनेत येते. मात्र आता तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशी एक पॉलिसी सांगणार आहोत ज्यात तुमचा पगाराला सुरक्षीत कवच दिले जाईल. याने तुमच्या नंतर देखील तुमच्या कुटूंबाचा पगार काही थांबणार नाही.
एलआयसीने तुमच्या पगाराला संरक्षण देणारी ही नविन पॉलिसी आणली आहे. यात तुम्हाला जोवर पगार सुरू आहे तोवर याचा फायदा होइल. म्हणजे पगार मध्येच बंद झाला तर याचा फायदा कुटूंबीयांना होत नाही. मात्र तुमचा मृत्यू झाला कर तुमच्या पगाराची साठवलेली रक्कम दर महा कुटूंबीयांना दिली जाते.
अनेक आसुर्विमा कंपन्या या योजना राबवत आहेत. ही एक मुदतीवर आधारीत पॉलिसी आहे. यात शेवटी कोणताही परिपक्व लाभ दिला जात नाही. तसेच ज्या व्यक्तीने पॉलिसी घेतली आहे तिला नॉमिनी द्यावा लागतो. पॉलिसी धारकाच्या मृत्यू नंतर हे पैसे त्या नॉमिनीलाच दिले जातात. याला टर्म इंश्युरंन्स पॉलिसी देखील म्हटले जाते. यात नियमीत उत्पन्न पेआउट स्वरूपात मिळते. ही पॉलिसी घेण्याआधी तिचे सर्व पैलू समजून घेणे गरजेचे आहे.
पगार संरक्षण विमा म्हणजे टर्म इन्शुरन्स होय. यात दोन पर्याय दिले जातात. पहिले म्हणजे तुम्ही नियमित रक्कम जमा करणे आणि दुसरे म्हणजे एकदाच जास्तीची रक्कम भरणे. जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला तर तुमच्या नंतर तुमच्या कुटूंबाला एकदाच संपूर्ण रक्कम दिली जाते. तसेच पहिला पर्याय निवडला तर तुमच्या कुटूंबाला तुम्ही नसताना दर महा रक्कम पुरवली जाते. कोणता पर्याय निवडावा हे तुमच्या आर्थिक गणितावर अवलंबून असते.
यात तुम्हाला टेक हेम म्हणून पर्याय असतो. जेव्हा तुम्ही यात गुंतवणूक करता तेव्हा तुमच्या पगारातील घरात दिल्या जाणा-या रकमेचा भाग तुम्हाला पॉलिसीत जमा करावा लागतो. तसेच तुम्ही किती कालावधीसाठी याची निवड करत आहात तो कालावधी ठरवावा लागतो. म्हणजे आता तुमचे वय ३० आहे आणि तुम्ही ही पॉलिसी घेतली तर तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Salary Protection Insurance Family will get salary even after you, read Salary Protection Insurance Benefits 28 October 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं