Multiple Credit Card | तुमच्याकडे एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आहेत का? याचा फायदा किती आणि नुकसान किती?

Multiple Credit Card | क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही नेमके कोणते क्रेडिट कार्ड वापरता यावर तुम्हाला मिळणारी सवलत ठरत असते. अनेकदा शॉपींग मॉल, मोबाईल शॉप, पेट्रोल पंप यावर आपण क्रेडिट कार्ड वापरतो. यात असे अनेक क्रेडिट कार्ड आहेत जे एकाच वेळी विविध ठिकाणी वापरता येतात. मात्र काही वेळा तुम्हाला विविध सुविधांसाठी एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड जवळ ठेवावे लागतात. तर एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणे फायद्याचे आहे की, तोट्याचे हे तुम्हाला माहीत आहे का?
आपले खर्च किती आहेत हे आपल्याला माहिती असते. त्यामुळे बचत व्हावी यासाठी अनेक व्यक्ती क्रेडीट कार्ड जास्त ठिकाणी वापरतात. आजच्या घडीला कॅशलेस ट्रांजेक्शन जास्त वाढत आहे. त्यामुळे सर्वजण क्रेडिट कार्ड वापरतात. यात तुम्ही तुमच्या खर्चाचे निट नयोजन केले तर तुम्हाला याचा फायदा होतो. जर तुम्ही एकच क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुमचा क्रेडिट कार्ड इतिहास फार नसणार. यामुळे प्रीमियम क्रेडिट कार्ड साठी तुम्ही पात्र नसल्याचे समजले जाते.
अशा वेळी तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे नियोजन करुण आणि गरजा लक्षात घेउन विविध क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करायला हवे. हे सर्व क्रेडिट कार्ड गरज असेल तेथेच वापरावी. तसेच त्याचे बिल वेळेत पूर्ण भरावे. तसे केल्यावर तुमच्या क्रेडिट स्कोरवर ते दिसेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर वाढेल. यात जर तुम्ही अजून पर्यंत क्रेडिट कार्ड वापरले नसेल किंवा नुकतेच मिळवले असेल तर तुम्ही एका क्रेडिट कार्डवर हा प्रवास सुरू करू शकता. सुरुवातीला एकच क्रेडिट कार्ड वापरणे फायद्याचे आहे.
प्रत्येक क्रेडिट कार्ड वेगवेगळ्या सेवा पुरवते. समजा तुमचे एक क्रेडिट कार्ड तुम्हाला प्रवास आणि ट्रॅवल्सची सेवा देत असेल तर दुसरे क्रेडिट कार्ड तुम्हाला हॉटेल्स आणि शॉपिंग मॉलसाठीच्या सेवा पुरवते. त्यामुळे एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड नेहमीच फायद्याचे ठरतात. यात तुम्ही तुमच्या सोई नुसार को-ब्रॅंडेड क्रेडिट कार्ड मिळवू शकता. जर विमानाचा वारंवार प्रवास करावा लागत असेल तर तुम्ही एअर मिले क्रेडिट कार्ड मिळवू शकता. तसेच सतत प्रवास करत असाल तर ट्रॅवल क्रेडिट कार्ड मिळवू शकता. तसेच शॉपिंग साठी त्याचे क्रेडिट कार्ड मिळवू शकता. तुमच्या आवडी निवडी आणि आवश्यकता यावर तुमच्या क्रेडिट कार्डचा पर्याय ठरवता येतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Multiple Credit Card What are the advantages and disadvantages of multiple credit cards 28 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं