Federal Bank Credit Card | क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांपर्यंत विमा मोफत, या खास ऑफरनंतर मोठ्याप्रमाणावर अर्ज

Federal Bank Credit Card | फेडरल बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आता बँकेच्या क्रेडिट कार्ड युजर्संना ग्रुप क्रेडिट शिल्डची सुविधा मिळणार आहे. या शिल्डअंतर्गत युजर्संना क्रेडिट मर्यादेएवढे जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतचे आयुर्विमा संरक्षणही मिळणार आहे. फेडरल बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना ही योजना ऑफर करण्यासाठी एजास फेडरल लाइफ इन्शुरन्सशी भागीदारी केली आहे. फेडरल बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्रुप क्रेडिट शील्ड हे एक विशेष कव्हर आहे. यामध्ये क्रेडिट मर्यादेएवढ्या यूजर्सला 1 वर्षाच्या मुदतीसाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतचे आयुर्विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
ग्रुप क्रेडिट शिल्ड योजना ऑनलाइन घेता येणार
यासाठी क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना अतिरिक्त कागदपत्रे किंवा वैद्यकीय तपासणीची गरज भासणार नाही, असे बँकेने म्हटले आहे. हा सिंगल प्रीमियम प्लान आहे. बँकेने या योजनेबाबत म्हटले आहे की, हे अशा ग्राहकांसाठी आहे, विशेषत: तरुणांसाठी आहे, ज्यांना सहजता आणि सुविधा हवी आहे, तसेच त्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता आवश्यक आहे. फेडरल बँकेने म्हटले आहे की, ग्रुप क्रेडिट शिल्ड योजना काही क्लिकसह ३ मिनिटांच्या आत ऑनलाइन घेता येईल. सध्या फेडरल बँक 3 प्रकारचे क्रेडिट कार्ड देत आहे. सेलेस्टा, इम्पेरिओ आणि सिग्नेट अशी त्या क्रेडिट कार्डांची नावं आहेत. हे तीन क्रेडिट कार्ड अनुक्रमे व्हिसा, मास्टरकार्ड आणि रुपे नेटवर्कच्या असोसिएशनकडून दिले जातात.
दुर्देवी घटना घडल्यास कर्ज फेडणे सोपे होणार
या योजनेची घोषणा करताना एजास फेडरल लाइफ इन्शुरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि हेड कार्तिक रामन म्हणाले, फेडरल बँकेच्या भागीदारीत क्रेडिट कार्ड युजर्ससाठी ग्रुप क्रेडिट शिल्ड योजना सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ते म्हणाले की, हे शिल्ड क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना जीवन विमा संरक्षण प्रदान करेल.
कुटुंबियांना कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत
ग्रुप क्रेडिट शील्ड वापरकर्त्यांचा खर्च सुरक्षित करेल आणि एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत करेल. फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालक शालिनी वॉरियर ग्रुप क्रेडिट शिल्ड प्लॅनची रचना फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. या योजनेसाठी पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया स्वीकारल्याने ग्राहकांची नक्कीच सोय होईल, असे ते म्हणाले. ही बंडल योजना सादर करताना कार्यकारी संचालक म्हणाले की, या छोट्या प्रयत्नांमुळे देशातील विमा पॉलिसीचे सदस्यत्व आणखी वाढेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Federal Bank Credit Card Offers Free Life Insurance benefits check details 01 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं