Ration Card | तुमच्या रेशनकार्डमध्ये घरातील नविन सदस्याचे नाव कसे नोंदवायचे? या टिप्स फॉलो करा

Ration Card | भारतात आजही गरिबी कायम आहे. बेरोजगारीमुळे आजही झोपड्यांच्या वसाहती पाहायला मिळतात. त्यामुळे शासना मार्फत सर्व गरिब, गरजू आणि अनेक मध्यमवर्गीय व्यक्तींकडे रेशनकार्ड हमखास पाहायला मिळते. हे कार्ड असल्यास त्यातून त्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याला अन्नधान्याच्या वस्तू मिळतात. त्यामुळे यामध्ये घरातील सर्व सदस्यांची नावे असणे गरजेचे असते.
रेशनकार्ड प्रत्येक गरिब आणि मध्यमवर्गिय व्यक्तीसाठी मोठा आधार आहे. इथे तुमच्या उत्पन्ना नुसार अन्नधान्य मिळते. जर तुमची आर्थिक परिस्थीती खुप गरिबीची असेल तर तुम्हाला मोफत धान्य देखील पुरवले जाते. अशात अनेकदा कुटूंबातील सदस्य वाढतात. नविन बाळाचा जन्म किंवा नववीवाहीत महिला. यांचे नाव रेशनकार्डमध्ये टाकावे लागते.
कारण ज्या व्यक्तींचे नाव यात आहे त्यांनाच याचा फायदा मिळवता येतो. अशात रेशनकार्डमध्ये नाव नोंदणी करणे देखील खूप सोपे आहे. जर तुम्हाला तुमच्या नवजात बाळाचे नाव रेशनकार्डमध्ये टाकायचे असेल तर बाळाच्या वडलांचे रेशनकार्ड असायला हवे. तसेच त्याचे आई वडील या दोघांकडेही आधार कार्ड पाहीजे तसेच बाळाचे जन्म प्रमाणपत्र हे कागदपत्र राशन ऑफीसला देउन तुम्ही बाळाचे नाव त्यात जोडू शकता. तसेच नव वधूचे नाव जोडण्यासाठी तिचे माहेरचे रेशनकार्ड आणि पतीचे रेशनकार्ड, लग्नाचे प्रमाणपत्र या गोष्टी असायला हव्यात.
रेशनकार्डचा उपयोग फक्त अन्नधान्य मिळवण्यासाठी होत नाही. इतर अनेक कामांमध्ये याचा उपयोग होत असतो. अनेक शासकीय, शालेय कामांमध्ये तुम्हाला रेशन कार्ड दाखवावे लागते. यावर तुमच्या घराचा पत्ता असतो. त्यामुळे हे एक प्रकारे तुमची ओळख पटवून देण्यास उपयोगी ठरते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Ration Card How to register the name of a new member of the household in the ration card 02 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं