Traffic Police | वाहन चालक आणि मालकांनो आजपासून नविन नियम लागू, नियम न मानल्यस मोठा दंड, नियम पहा

Traffic Police | नोव्हेंबर महिना सुरु होताच विविध गोष्टींवरील नियम बदलेले गेले आहेत. यात अगदी विमा पॉलिसी पासून वाहतूकी पर्यंत अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. अशात आज आपण कार चालकांसाठी कोणते नविन नियम लागू करण्यात आले आहेत हे पाहू.
कार चालकाला सिट बेल्ट वापरणे बंधनकारक आहे हे तुम्हाला माहितच असेल. मात्र आता १ नोव्हेंबर पासून यात आणखीन बदल करुण कारच्या मागच्या सिटवर बसलेल्यांना देखील सिट बेल्ट बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही आता घरातून बाहेर पडत आहात आणि कारने प्रवास करणार आहात तर सिट बेल्ट नक्की लावा. अन्यथा वाहतूक पोलिसांकडून तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे हे नियम फार महत्वाचे आहेत.
काही महिन्यांनपूर्वीच दिल्लीत हा नियम लागू करण्यात आला तिथे अनेकांकडून आता दंड देखील वसूल केला जात आहे. मुंबईमध्ये अद्याप दंड वसूल करण्यास सुरुवात केलेली नाही. मात्र वाहतूक पोलिस आता मागच्या सिटवर सिट बेल्ट लावून न बसलेल्यांना चांगालीच तंबी देणार आहेत. तसेच १५ दिवसांनंतर दंड वसूल करण्यास सुरुवात होईल.
मुंबईमध्ये या आधी दुचाकीस्वारांसाठी कठोर नियम करण्यात आले. दुचाकीवर होणारे अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सर्व दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट कंपल्सरी करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शिवसंग्रामचे माजी आमदार विनायक मोटे आणि टाटा समुहासे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. तसेच इतरही सामान्य नागरिक कार अपघातात आपला जीव गमावत आहेत. त्यामुळे सिट बेल्ट संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे.
जर तुम्ही आता सिट बेल्ट लावले नसेल तर वाहतूक पोलिसांकडून तुम्हाला दम दिला जाऊ शकतो. तसेच तुम्ही ही गोष्ट न ऐकल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आज पासून घरा बाहेर पडताना कार वाहतूकीसाठी सिट बेल्ट लावण्याची सवय लावा. अन्यथा १५ दिवसांनंतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Traffic Police New rules for car enthusiasts from today big fines for non-compliance 02 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं