ब्रेकिंग न्यूज - उद्या होणार भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका

पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती आणि कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.
भारतीय हद्दीद शिरलेल्या ३ पाकिस्तानी लढाऊ विमानांना परतवत असताना १ भारतीय विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले आणि त्याचे वैमानिक अभिनंदन वर्तमान मात्र यातून बचावले. खाली पडल्यानंतर तिकडे उपस्थित असलेल्या काश्मीर स्वातंत्र्य चळवळीतल्या काही लोकांनी त्यांना लाथा बुक्यांनी मारायला सुरुवात केली. सुदैवाने पाकिस्तान लष्कर वेळेत आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
भारत सरकारने कडक पवित्रा घेत आणि आंतरराष्ट्रीय जिनेव्हा कायद्याची आठवण करून देत अभिनंदन यांना ताबडतोब भारतात पाठवण्याची मागणी केली. अभिनंदन यांना भारतात परत आणण्यासाठी सर्वसामान्य स्तरातून लोकांनी मोठा सूर लावला होता आणि पाकिस्तान सरकारने भारतीयांच्या मागणीचा मान म्हणून कोणतीही अट न ठेवता भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांना सोडण्याचा निर्णय घेतला. उद्या सकाळी त्यांना भारतात परत पाठवण्यात येईल असे खात्रीलायक वृत्त आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं