Post Office Investment | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 50 रुपये जमा करा, मॅच्युरिटीवर मिळवा 34 लाख, हिशेब समजून घ्या

Post Office Investment | आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करून हमी परतावा कमवायचा असतो. त्यामुळे भारतील लोक पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे लावण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक प्लॅनमध्ये आपण जी गुंतवणुक करतो, त्यात कोणतीही जोखीम नसते, त्यामुळे लोक अशा योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक करतात. भारतीय ग्रामीण भागात विमा किंवा गुंतवणुकीचे सरासरी प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत खूपच कमी आहे. हे लक्षात घेऊन इंडिया पोस्ट ऑफिसने “ग्रामीण डाक जीवन विमा योजना” सुरू केली आहे. 24 मार्च 1995 रोजी सुरू इंडिया पोस्ट ऑफीसने ग्रामीण भागातील लोकांना विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून ग्रामीण डाक जीवन विमा योजना सुरू केली होती.
आज आम्ही या लेखात आम्ही तुम्हाला “ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्लॅन” पैकी एक “होल लाइफ अॅश्युरन्स” योजनेबद्दल सविस्तपणे माहिती देणार आहोत. इंडिया पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त दररोज 50 रुपये जमा करावे लागतील. आणि योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 34 लाख रुपयाचा लाभ होईल. 1995 साली इंडिया पोस्ट ऑफिसने ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांसाठी 6 विविध विमा योजना सुरू केल्या होत्या.
विमा संरक्षण 80 वर्षांपर्यंत उपलब्ध :
1995 साली इंडिया पोस्ट ऑफिसने ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजने अंतर्गत भारतातील ग्रामीण भागातील लोकांसाठी 6 विविध गुंतवणूक योजना सुरू केल्या होत्या. पोस्ट ऑफिसची संपूर्ण जीवन विमा योजना “ग्राम सुरक्षा विमा योजना” म्हणूनही ओळखली जाते. या विमा योजनेत पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीला वयाच्या 80 वर्षापर्यंत वैयक्तिकरित्या जीवन विमा सुरक्षा प्रदान केली जाते. जर विमा धारक व्यक्ती वयाच्या 80 वर्षांनंतरही जिवंत राहिली तर त्या व्यक्तीला योजनेच्या मॅच्युरिटीचा जबरदस्त लाभ मिळू शकतो. जर विमा धारक व्यक्तीचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर त्याच्या/तिच्या नॉमिनीला म्हणजेच नामनिर्देशित व्यक्तीला विम्याची पूर्ण रक्कम दिली जाईल.
कमाल विमा मर्यादा :
इंडिया पोस्ट ऑफिसच्या या विमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा 19 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या पोस्ट ऑफीसच्या ग्रामीण जीवन विमा स्कीममध्ये विमा रकमेची किमान मर्यादा 10,000 रुपये आणि कमाल 10,00,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही या विमा योजनेत गुंतवणूक केली तर, तुम्हाला 4 वर्षानंतर कर्ज घेण्याची सुविधा मिळेल.
प्री-मॅच्युरिटी नियम :
जर समजा तुम्हाला आर्थिक अडचण असेल, आणि तुम्हाला या स्कीम मधील पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढायचे असतील, तर तुम्ही ही विमा पॉलिसी घेतल्यानंतर तीन वर्षांनंतर सरेंडर करून आपले पैसे काढू शकता. तथापि, एक नियम लक्षात असू द्या, योजना सुरू केल्यावर 5 वर्षापूर्वी पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला बोनसचे कोणतीही फायदे दिले जाणार नाही.
फक्त 50 रुपये गुंतवणूक :
जर तुम्ही इंडिया पोस्ट ऑफिसच्या या जीवन विमा प्लॅनमध्ये आपल्या वयाच्या 20 व्या वर्षीपासून गुंतवणूक सुरू केली तर, तुमच्या 50 व्या वर्षीपर्यंत तुम्हाला दर महा 1666 + GST प्रीमियम म्हणून भरावे लागेल, जेणे करून तुम्ही दहा लाख परतावा मिळवू शकता. जर तुम्हाला 55 व्या वयापर्यंत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 1515.58 रुपये जमा करावे लागले. आणि 60 वर्षांच्या परिपक्वतेसाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1388 रुपये प्रीमियम जमा करावे लागेल. जर तुम्ही या विमा योजनेच्या मॅच्युरिटीसाठी वयाची 60 वर्षे निश्चित केली असेल तर तुम्हाला पुढील 40 वर्षांसाठी 1388 रुपये मासिक प्रीमियम जमा करावा लागेल, जो दररोज 50 रुपयांपेक्षा पडेल.
योजनेतील परताव्याची गणना :
या जीवन विमा प्लॅनमध्ये सध्या इंडिया पोस्ट ऑफिसकडून आपल्या ग्राहकांना प्रति 1,000 विमा रकमेवर 60 रुपये वार्षिक बोनस रक्कम दिली जाते. या गणनेनुसार, 10 लाखांच्या विमा रकमेवर तुम्हाला इंडिया पोस्ट ऑफिस 60 हजार रुपये वार्षिक बोनस म्हणून देईल. अशाप्रकारे पुढील 40 वर्षांपर्यंत वार्षिक 60 हजार रुपये जोडत राहिल्यास तुम्हाला मुदत पूर्ण झाल्यावर 24 लाख रुपये बोनस म्हणून दिला जाईल. अशा स्थितीत ही विमा योजना परिपक्व झाल्यावर विमा धारक व्यक्तीला 24 लाख रुपयांच्या बोनस सोबत 10 लाख रुपयांची पूर्ण विमा रक्कम दिली जाईल. अशा प्रकारे दररोज फक्त 50 रुपये जमा करून तुम्ही 60 व्या वर्षी 34 लाख रुपये मिळवू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Post Office Investment In Rural Life insurance policy for long term benefits and huge returns on 02 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं