My Gratuity Money | ग्रॅच्युइटी म्हणजे काय? ग्रॅच्युइटीचे सर्व नियम, पात्रता आणि हक्काच्या पैशाचं गणित समजून घ्या

My Gratuity Money | तुम्ही जर सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरी करणारे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. ही महत्वाची माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. तुम्हाला ग्रॅच्युइटी म्हणजे काय हे माहिती असेलच. ग्रॅच्युइटी म्हणजे कर्मचार्याला दिले जाणारे असे बक्षीस असते, जे कंपनी पाच किंवा अधिक वर्ष काम करणाऱ्या लोकांना देते. जेव्हा कर्मचारी एखाद्या संस्थेत किंवा कंपनीत दीर्घकाळ काम करतो, तेव्हा विशिष्ट कालावधीनंतर, निवृत्तीनंतर, किंवा नोकरी सोडल्यानंतर कंपनीकडून कर्मचारीला एक विशिष्ट रक्कम दिली जाते, या रकमेला “ग्रॅच्युइटी” असे म्हणतात. भारतात ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान पाच वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच जर कर्मचाऱ्याने एका कंपनीत टिकुन पाच वर्षे काम केले, तर त्याला त्या कंपनीकडून नोकरी सोडल्यावर किंवा निवृत्तीनंतर बक्षीस म्हणून ग्रॅच्युइटी रक्कम दिली जाते.
ग्रॅच्युइटीचे नियम :
जर एखाद्या कंपनीत किंवा कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेत 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी काम करत असतील, तर त्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी रक्कम देणे बंधनकारक असते. हा नियम सरकारी आणि खासगी अशा दोन्ही संस्थांना लागू होतो. यासोबतच दुकाने, कारखाने यांनाही ग्रॅच्युइटीचा नियम लागू होतो. कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युइटीसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुमची कंपनीची ग्रॅच्युइटी कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे की नाही याची खातरजमा तुम्ही केली पाहिजे. जर तुमच्या कंपनीची नोंदणी झाली असेल तर नियमांनुसार कंपनीला सर्व कर्मचारीला ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक आहे. परंतु जर तुमची कंपनी नोंदणीकृत नसेल तर तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळणार नाही, किंवा ग्रॅच्युइटी द्यायची आहे की नाही हे सर्व निर्णय कंपनीच्या इच्छेवर अवलंबून राहील.
भारतात ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान कालमर्यादा 5 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीत 4 वर्षे 8 महिने काम केले असेल तर हा कालावधी पूर्ण पाच वर्षे मानला जाईल. जर तुम्ही कंपनीत 4 वर्षे 7 महिने काम केले असेल तर हा कालावधी 4 वर्षे मानला जाईल. अशा स्थितीत कालावधी पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही ग्रॅच्युइटी घेण्यासाठी पात्र असणार नाही. यामध्ये तुमचा नोटीस कालावधी नोकरीच्या दिवसांमध्येच मोजला जाईल. दुसरीकडे, जर कर्मचाऱ्याचा निवृत्तीपूर्वी किंवा नोकरी सोडण्यापूर्वी मृत्यू झाला, तर संबधित कंपनीला कर्मचाऱ्याच्या नॉमिनीला पूर्ण ग्रॅच्युइटी रक्कम द्यावी हस्तांतरित करावी लागेल. या परिस्तिथीत किमान कालावधीचा नियम लागू होणार नाही.
ग्रॅच्युइटी मोजण्याचे नियम :
तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळेल हे मोजण्याचा एक नियम निश्चित करण्यात आला आहे. (शेवटचा पगार) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) x (15/26). एका महिन्यातील रविवारचे 4 दिवस सुट्टीचे दिवस म्हणून गणले जातात. त्यामुळे एका महिन्यात कामाचे फक्त 26 दिवस मोजले जातात आणि ग्रॅच्युइटी किमान 15 दिवसांच्या आधारे मोजली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या कंपनीत 20 वर्षे काम केले आणि आता नोकरी सोडली तर तुमचा शेवटच्या पगाराच्या आधारे आपण गणना करू. समजा तुमचा शेवटचा पगार 25,000 रुपये असेल, तर तुम्ही आपली ग्रॅच्युइटीची रक्कम मोजण्यासाठी हे सूत्र वापरू शकता. या सूत्रानुसार, तुमची ग्रॅच्युइटीची रक्कम 20x25000x15/26 = रुपये 2,88,461.54 असेल.
भारत सरकार देशात नवीन लेबर कोड बिल आणण्याचा विचार करत आहे. ही नवीन कामगार संहिता अस्तित्वात आल्यानंतर खासगी संस्था आणि सरकारी विभाग आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, सुट्या, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी यासंबंधीच्या नियमांमध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत. याचा सर्वाधिक फायदा सेवानिवृत्त कर्मचारी किंवा नोकरी बदलणाऱ्या लोकांना होणार आहे. नवीन कायद्यानुसार ग्रॅच्युइटीच्या 5 वर्षांची किमान पात्रता कालमर्यादा कमी करून एक वर्ष केली जाईल अशी माहिती मिळत आहे. म्हणजेच यापुढे एक वर्षानंतर नोकरी बदलणाऱ्या लोकांनाही ग्रॅच्युइटी रक्कम मिळवता येईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| My Gratuity money Calculation formula and New labour law with minimum Eligibility for gratuity on 05 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं