Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 साठी अक्षयने इतके कोटी मागितले, निर्मात्यांनी तिकीट कट करत कार्तिकला साइन केले

Hera Pheri 3 | सुपरस्टार अक्षय कुमारचे स्टार्स सध्या अंधारात असताना कार्तिक आर्यन मात्र निर्माता आणि दिग्दर्शकांची पहिली पसंती कायम आहे. आधी ‘भूल भुलैया 2’मध्ये आणि आता ‘हेरा फेरी 3’मध्ये त्याने खिलाडी कुमारची जागा घेतली. मात्र अक्षयशिवाय ‘हेरा फेरी’ची कल्पना करणं अनेकांना कठीण जातं. पण बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया 2’चं यश पाहून चाहते कार्तिक आर्यनवर ‘हेरा फेरी 3’ साठी नक्कीच विश्वास ठेवू शकतात. मात्र अक्षयचे चाहते या चित्रपटात न आल्याने निराशा व्यक्त करत आहेत.
कार्तिकची फी खूपच कमी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारने ‘हेरा फेरी 3’ साठी निर्मात्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात फीची मागणी केली होती. यामुळे चित्रपटात त्याच्या जागी कार्तिक आर्यनला घेण्यात आलं होतं. अक्षय कुमारने या चित्रपटासाठी 90 कोटींची मागणी केली होती, जी निर्मात्यांनी मंजूर केली नव्हती. अशा परिस्थितीत कार्तिक आर्यनची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिकने ‘हेरा फेरी 3’ साठी 30 कोटी रुपये घेतले घेतले.
या चित्रपटांमध्येही दिसणार जादू
त्याचबरोबर कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कार्तिक लवकरच ‘फ्रेडी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पुढच्या महिन्यात म्हणजे २ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा अभिनेता ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटात कियारा अडवाणीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त कार्तिककडे सध्या ‘कॅप्टन इंडिया’, ‘शहजादा’ आणि ‘आशिकी ३’ हे चित्रपटही आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Hera Pheri 3 superstar Akshay Kumar out but Kartik Aaryan in check details on 14 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं