पुलवामा हल्ला मोदी व इम्रान खान यांच्यामधील पूर्वनियोजित मॅच फिक्सिंग: काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला हा देशाच्या लष्करावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली होती. त्याला भारताने हवाई हल्ला करून चोख प्रत्युत्तर देखील दिलं. परंतु, सदर प्रकरणी काँग्रेस नेत्याने एक धक्कादायक आरोप केला आहे. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पूर्वनियोजित पणे फिक्स केला होता, असा हा आरोप केला आहे.
पुलवामा हल्ल्यात भारताचे तब्बल ४४ जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याचा देशभरातून निषेध नोंदवण्यात आला. इतकेच नाही तर या हल्ल्यानंतर बरोबर १३व्या दिवशी भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला प्रत्युत्तर देखील दिले. आता या हल्ल्यावरून विषय रंगताना दिसतं आहे. कारण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष प्रचारात जवानांच्या शौर्याचं श्रेय स्वतः लाटत आहेत असा आरोप विरोधक तसेच सामान्य देखील करू लागले आहेत. त्यात आता काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी पुलवामा हल्ला पूर्वनियोजित म्हणजे फिक्स होता, असे सांगत खळबळ उडवून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी छुपी हातमिळवणी केली आहे. या दोघांची हातमिळवणी नसती तर हा हल्ला होऊच शकला नसता असंही हरिप्रसाद यांनी म्हटलं आहे. काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत बी. के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हा गंभीर आरोप केला आहे.
विशेष म्हणजे दोन्ही नेते पंतप्रधान झाल्यानंतर नव्हे तर, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची तेहरीक-ए-पाकिस्तान या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासोबत नवी दिल्लीत २००३ साली एका कार्यक्रमात मैत्रीपूर्ण भेट देखील झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण सलोखा असल्याचे पाहायला मिळाले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं