Jio Phone 5G | जिओ फोन 5G स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम, गीकबेंच लिस्टिंगसह हे सर्व फीचर्स मिळतील

Jio Phone 5G | जिओचा 5 जी फोन प्रमाणपत्र साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमध्ये जिओचा ५ जी कनेक्टिविटी स्मार्टफोन फोनची सुविधा उपलब्ध होण्यापूर्वीच भारतात सादर करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी जिओने 5 जी स्मार्टफोन लाँच केल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
सर्व फीचर्स उपलब्ध होण्याची शक्यता
‘जिओ फोन ५ जी’ बेंचमार्क वेबसाइट गीकबेंचच्या लिस्टिंगमध्ये “जिओ एलएस १६५४ क्यूबी ५” या शीर्षकासह स्पॉट झाले होते. संबंधित साइटच्या लिस्टिंगमध्ये डिव्हाइसची काही अपेक्षित स्पेसिफिकेशन्स समोर आली आहेत जी आगामी जिओ फोन 5 जी सोबत दिली जातील. याआधी जिओच्या आगामी 5 जी डिव्हाईसचा डिस्प्ले 6.5 इंचाचा असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. एचडी + एलसीडी डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज असेल.
मायस्मार्टप्रिसच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, जिओच्या आगामी 5 जी स्मार्टफोनला ‘होली’ असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे, म्हणजेच जिओचा लेटेस्ट हँडसेट स्नॅपड्रॅगन 480+ चिपसेटसह एड्रेनो 619 जीपीयूसह सुसज्ज असू शकतो. गीकबेंचच्या लिस्टिंगनुसार, जिओ फोन 5 जी अँड्रॉयड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. फोनमध्ये प्रगतीओएसवर जिओची ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. लिस्टिंगनुसार, आगामी जिओ फोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात येणार आहे.
ड्युअल रियर कॅमेरा सेटअप
फोटोग्राफीच्या बाबतीत सांगायचं झालं तर या नव्या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फॉन्ट कॅमेरा असेल. जिओच्या आगामी ५जी हँडसेटमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी असणार आहे. ज्यात चार्जिंगसाठी १८ वॉट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. स्मार्टफोनमध्ये गुगल मोबाइल सेवा आणि जिओ अॅप्स मिळू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Jio Phone 5G price with features check details on 10 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं