Mutual Fund SIP | रोजचा खर्च कमी करून होऊ शकता करोडपती, 100 रुपयांची SIP देईल इतका कोटी परतावा

Mutual Fund SIP | गुंतवणूकदाराकडे अनेक पर्याय आल्यानंतर अधिकाधिक निधी उभारण्याचा विचार प्रत्येकजण करत असतो. जेथे कमी गुंतवणुकीवर अधिक नफा मिळतो, अशा योजनांमध्ये अधिक पैसे गुंतविण्याचा विचार गुंतवणूकदार करीत आहेत. आर्थिक नियोजनाचे योग्य नियोजन करून चांगला नफा कमावता येतो व जास्तीत जास्त रक्कम जोडता येते.
तुमचा फालतू खर्च रोजच्या रोज कमी करून तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक (Mutual Fund SIP Investment) केलीत, तर हे काम तुम्हाला सोपं जाऊ शकतं. फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही एक चांगला रिटायरमेंट फंड उभारू शकता. त्यासाठी तुम्हाला नियमित गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही मधल्या काळात गुंतवणूक करणं बंद केलंत, तर तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यात अडचणी येऊ शकतात.
किती कोटी रुपये मिळतील
दैनंदिन खर्च कमी करून दररोज १०० रुपये गुंतविले तर ३० दिवसांत ३००० रुपये एसआयपीअंतर्गत जमा होतील. आता हे पैसे एसआयपी अंतर्गत दर महिन्याला गुंतवा, निवृत्तीपर्यंत कोट्यवधी रुपये मिळू शकतात. ३० वर्षांसाठी दरमहा ३ हजार रुपये १२ टक्के व्याजाने गुंतवल्यास १ कोटी ५ लाख ८९ हजार रुपये मिळतील.
तुम्हाला सुमारे 11 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल
यामध्ये 95 लाखांची रक्कम परत मिळणार आहे. तसेच गुंतवलेले उत्पन्न १० लाख ८० हजार रुपये असेल. तीस वर्षांत सुमारे ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर १.१ कोटी रुपये (Return on Mutual Fund SIP) मिळतील, असेही समजू शकते. मात्र, व्याज १२ टक्के असावे.
रक्कम वाढवल्यावर अधिक निधी उपलब्ध होणार
ही रक्कम वाढवून दरमहा पाच हजार रुपये केल्यास गुंतवणूकदारांना ३५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर ३.२ कोटी रुपये १२ टक्के व्याजाने मिळतील. गुंतवणुकीचे प्रमाण जितके वाढेल तितके फंड जमा करू शकतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mutual Fund SIP with daily 100 rupees investment check details on 16 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं