चौकीदारने नाही! लंडनमधील मेट्रो बँकेच्या सतर्क कर्मचाऱ्याने स्कॉटलँड यार्ड पोलिसांना कळवले

लंडन : भारतातील बहुचर्चित पंजाब नॅशनल बँकेतील महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी याला इंग्लंडमधील स्कॉटलँड यार्डने अटक केली आहे. विशेष म्हणजे भारतातील चौकीदार सतर्क असल्याच्या भारतीय प्रसार माध्यमांमध्ये बातम्या झळकत असल्या तरी त्यामागील वास्तव वेगळंच आहे. कारण लंडनमध्ये वास्तव्यास असलेला नीरव मोदी मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी त्याच बँकेतील सतर्क कर्मचाऱ्याने लंडनमध्ये झळकलेल्या वृत्तानुसार त्याला अचूक ओळखले आणि त्याला बेसावध ठेवून पोलिसांना कळवले आणि अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अशी माहिती समोर आली आहे.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी हमीपत्र (एलओयू) प्राप्त केले आणि परदेशात पीएनबीला हजारो कोटी रुपयांनी गंडवले. एवढेच नव्हेतर त्याने देशात अनेक बनावट कंपन्या तयार केल्या. बनावट संचालक दर्शवून बँकांना लुबाडले होते. हा घोटाळा तब्बल १३ हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. हा महाघोटाळा उघड होण्यापूर्वीच नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि त्यांचे कुटुंबीय देशाबाहेर पळाले होते. काही दिवसांपूर्वी लंडनमधील एका इंग्रजी वृत्तपत्राने नीरव मोदीचा शोध घेतला आणि नीरव मोदी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर दिसला. नीरव मोदीने पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले होते.
कालच म्हणजे बुधवारी नीरव मोदी लंडनमधील मेट्रो बँकेत खाते उघडण्यासाठी गेला होता. नीरव मोदी बँकेत पोहोचताच तेथील एका कर्मचाऱ्याने नीरव मोदीला ओळखले आणि त्याने नीरव मोदीबाबतची माहिती पोलिसांना दिली. अवघ्या काही क्षणातच स्कॉटलँड यार्डचे पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी नीरव मोदीला अटक केली, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. भारतीय बँकेला गंडवणारा नीरव मोदी शेवटी एका बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळेच तुरुंगात गेला.
नीरव मोदीने त्याच्या वकिलांमार्फत पोलिसांसमोर शरण जाण्याची तयारी दर्शवली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. २५ मार्च रोजी नीरव मोदी वकिलांसोबत पोलिसांसमोर हजर होणार होता, असे सांगितले जाते. मात्र, नीरव मोदीचा हा प्रयत्न फसला आणि शेवटी त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. अटकेनंतर ४८ वर्षीय नीरव मोदीने लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच कर भरल्याचे आणि प्रवासाचे कागदपत्रही सादर केले होते. त्याचे वकील जॉर्ज हेबुर्न स्कॉट यांनी आपल्या अशीलाकडे प्रवासाचे तीन वेगवेगळे परवाने आहेत, असे न्यायालयाला सांगितले. परंतु जिल्हा न्यायाधीश मॅरी मॅलान यांनी जामीन अर्ज नामंजूर केला. तसेच त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे ४ वर्षांपासून भारतातील चौकीदार आणि निरव मोदीला घोटाळ्यात सामील असलेले इथले बँक कर्मचारी जरी झोपलेले असले तरी लंडनमधील बँक कर्मचारी एकाच बातमीने सतर्क झाले आणि बँक घोटाळातर दूरच, पण साधं बँक अकाउंट सुरु करण्यासाठी गेला आणि तावडीत सापडला. त्यामुळे भारतातील ‘चौकीदार चौकन्ना है’ यासर्व अफवा आहेत. कारण भारतातील चौकीदार चौकन्ना असता तर भारतातून सुखरूप पळालाच नसता हे वास्तव आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं