Yes Bank Share Price | येस बँकेचा शेअर 3 दिवसात 10% वाढला, स्टॉक वाढीचे नेमकं कारण वाचून खरेदीचा विचार करा

Yes Bank Share Price | मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी येस बँक शेअर्स हिरव्या निशाणी वर ट्रेड करत होते, मात्र बुधवार दिनांक 4 जानेवारी रोजी येस बँकेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. येस बँकेचे शेअर्स आज लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारी येस बँकेचे शेअर्स 3 टक्क्यांनी वधारले होते. त्यानंतर आज शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. सध्या बीएसई इंडेक्सवर येस बँक कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के घसरणीसह 21.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. येस बँक कंपनीचे शेअर्स सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. या शेअरमधे अचानक तेजी येण्याचे कारण ‘फाल्कन’ ही स्टार्टअप कंपनी आहे. येस बँकेने फाल्कन कंपनीसोबत बिझिनेस करार केला असल्याची बातमी जाहीर केली आहे. त्यामुळे येस बँक शेअर्स तेजीत धावत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
फाल्कनशी हातमिळवणी :
येस बँक आणि फाल्कन या दोन्ही कंपनीने एक व्यापारी भागीदारी केली आहे. फाल्कन ही अमेरिकेतील एक स्टार्ट अप कंपनी असून ती आपल्या ग्राहकांना बीएएस म्हणजेच बँकिंग-एज-सर्व्हिस प्रदान करते. फाल्कन ही अमेरिकन कंपनी येस बँके शिवाय, ICICI बँक, Indusind बँक, पंजाब नॅशनल बँक, Visa आणि NPCI देखील आपल्या सेवा सुविधा प्रदान करते.
येस बँक शेअरची किंमत :
मंगळवारी येस बँक शेअर्स 2.77 टक्क्यांच्या वाढीसह 22.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर हा स्टॉक त्यावेळी इंट्रा-डे उच्चांक किंमत पातळीवर गेला होता. येस बँकेच्या गुंतवणूकदारांनी 2022 या वर्षात उत्तम कमाई केली आहे. या कालावधीत येस बँक शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 57.78 टक्के परतावा कमवून दिला आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी येस बँकचे शेअर 20.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दुसरीकडे मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12.41 टक्क्यांनी वाढली आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी येस बँक शेअर 1.35 टक्के घसरणीसह 21.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मायक्रोसॉफ्ट आणि येस बँक करार :
आजच्या युगात बँकिंग प्रणालीमध्ये वेगाने सुधारणा होत आहेत. येस बँक आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेगाने तंत्रज्ञान बदल करत आहे. येस बँक सुधारणा करण्याच्या बाबतीत कोणाच्याही मागे पडू इच्छित नाही. येस बँकेने मंगळवारी एका निवेदनात म्हंटले आहे की, कंपनीने फोर्थ जनरेशन पिढीतील मोबाइलसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत एक व्यापारी करार केला आहे. येस बँक मायक्रोसॉफ्टच्या मदतीने आपल्या नवीन अॅपमध्ये बँकिंग सुविधांव्यतिरिक्त ऑनलाइन पेमेंट, शॉपिंग, रिवॉर्ड्स ऑफर्स, तसेच कस्टमाइज्ड डॅशबोर्ड, या सर्व सुविधा जोडण्याचा प्रयत्न येस बँक करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Yes Bank Share Price 532648 in focus check details on 04 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं