पालघर लोकसभेसाठी माकपचा बविआला पूर्ण पाठिंबा, आता तिरंगी लढत होणार

पालघर : माकपकडून पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, तर त्यामोबदल्यात दिंडोरीत बहुजन विकास आघाडीकडून माकपला सर्वतोपरी मदत सहकार्य देण्याचं आश्वासन बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिलं आहे.
त्यामुळे या जागेसाठी आता तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे. इतिहासात पहिल्यांदाच माकप लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. पालघर येथील मनोरमध्ये बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि अशोक धावले यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करून ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
केवळ सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणं हे आमचं एकमेव उद्धिष्ट आहे आणि त्यामुळेच मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून माकपने बविआला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच त्यामोबदल्यात दिंडोरीत बविआकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन घेतलं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यांमध्ये माकपची मोठी राजकीय ताकद आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत बविआने मोठ्या प्रमाणावर मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होती, तर माकपने चौथ्या क्रमांकाची मतं घेतली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं