नोटबंदीचा हेतूच फसला! चलनातील नोटांची संख्या पुन्हा वाढली: आरबीआय अहवाल

नवी दिल्ली : देशातील रोख रक्कमेत होणार्या व्यवहारांमुळे काळ्या पैशाच्या निर्मितीला चालना मिळते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. मात्र रोख रक्कमेवर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला. मार्च २०१९ पर्यंत नोटांचे प्रमाण १९.१४ टक्क्यांनी वाढले आहे. चलनातील एकूण नोटा २१.४१ लाख कोटी एवढ्या आहेत.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालात ही नोटांची संख्या देण्यात आली आहे. नोटबंदी होण्यापूर्वी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी भारताच्या अर्थव्यवस्थेत १७.९७ लाख कोटी रुपयांची रोकड होती. नोटबंदीनंतर नवीन नोटा छापण्यास प्रचंड वेळ लागत असल्यामुळे नोटांच्या रोकडीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत हे नोटांच्या रोकडीचे प्रमाण पूर्वीपेक्षाही वाढले आहे.
भारतातील लोक आजही सर्व व्यवहार रोखीने करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत रोकड वाढते. नरेेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर बहुतेक व्यवहार डिजिटल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्नही फारसा यशस्वी झालेला नाही. नोटबंदीनंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून मोदींनी संपूर्ण देशाला नोटांसाठी बँकेबाहेर रांगा लावाव्या लागल्या होत्या व रांगेत अनेकजण मृत्यू पावले होते. मोेदींची नोटबंदी पूर्णपणे फसली हेच यातून सिद्ध होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं