कोणते दिवे लावले म्हणून युतीच्या अधिक जागा ते सर्व्हेत का येत नाही? नेटिझन्स

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक ओपिनियन पोल अर्थात सर्व्हे येण्यास सुरुवात झाली असून त्यात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेला घवघवीत यश मिळणार असं दाखविण्यात आलं आहे. वास्तविक शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी, ६३ आमदार आणि १८ खासदारांनी नक्की विकास कामांचे कोणते दिवे लावले आहेत, म्हणून लोकं त्यांना भरघोस मतदान करणार आहेत? अशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.
संपूर्ण कार्यकाळ राजीनामा नात्यात घालवणारी शिवसेना आणि केवळ भावनिक मुद्यांवर भाषणबाजी करणारे उद्धव ठाकरे यांनी ५ वर्षात काय विकास केला याच उत्तर एकाही वृत्तवाहिनीकडे नसताना असे सर्व्हे येतातच कसे असा प्रश्न समाज माध्यम उपस्थित करत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी देखील स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांवर बिनकामाचे असे जाहीर केले आहेत. मग सामान्य माणसाची मतं कोणत्या आधारावर या सर्व्हेत नोंदवली जातात ते समजू शकलेलं नाही.
त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर रंगलेल्या या चर्चेतून अशा सर्व्हेवरच प्रश्न चिन्हं उपस्थित करण्यात येत आहे. सामान्य लोकांमध्ये केवळ एक भावनिक चेतना जागविण्याचे काम या पेड सर्वेमधून करण्यात येत आहे का असे ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं