अंधेरी पूर्व विधानसभा: भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज नायक यांची जबाबदारी वाढली?

मुंबई : मुंबईमधील अंधेरी विधानसभा क्षेत्रात भाजपाची भिस्त असलेले विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल सध्या अनेक विवादास्पद प्रकरणांमध्ये अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच नगरसेवक मुरजी पटेल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा दंड म्हणजे तब्बल २४ लाख रुपये भरपाई निमित्त देण्यास सांगितले. कारण होतं अनधिकृत होर्डिंग प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करणे. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांना लेखी प्रतिज्ञापत्र देणं भाग पडल्याने, भविष्यात लहानशी चूक झाली तरी त्यांचं पद धोक्यात येऊ शकतं आणि मोठी किंमत स्थानिक भाजपाला मोजावी लागू शकते. त्यासोबतच स्थानिक भाजप नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी तसेच नगरसेविका केसरबेन पटेल या दोघांवर सध्या जातीच्या प्रमाणपत्रावरून मुंबई उच्च न्यायालयात खटले दाखल आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील शिवसेना आणि काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत असताना, स्थानिक भाजप मात्र नव्या नैतृत्वाकडे आस लावून आहेत.
तसेच अंधेरी पूर्व येथे आकृती बिल्डर संबंधित अनेक एसआरए प्रकल्प असून, त्यामध्ये मोठी अनियमितता आहे, तसेच मूळ स्थानिकांना डावलून अपात्र लोंकांनी घुसखोरी केल्याने स्थानिकांचा मुरजी पटेल यांच्यावर प्रचंड रोष आहे. तसेच अनेक महिन्यांपासून पात्र उमेदवारांना जे भाडं मिळत ते देखील मोठ्या प्रमाणावर थकीत आहे आणि मुरजी पटेल यांचं त्याप्रकल्पांशी नाव जोडलं गेल्याने अंधेरी पूर्व येथील लोकांचा त्यांच्यावरील रोष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
सध्या अंधेरी पूर्व येथे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मनोज नायक यांची राजकीय प्रतिमा स्वच्छ असून ते सामन्यांमध्ये परिचित आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आदर असलेले भाजप नेते आहेत. बंजारा फाऊंडेशन अध्यक्ष असलेले मनोज नायक विविध सेवाभावी संस्थांशी जोडलेले असल्याने ते अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील लोकांना परिचित असलेला चेहरा आहेत. बंजारा फाऊंडेशनच्या मार्फत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून तरुणांना स्वतःसोबत जोडले आहे.
सध्या मुरजी पटेल यांची प्रतिमा अनेक प्रकरणांमुळे डागाळली असून त्यांचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. त्यात काँग्रेस, शिवसेना आणि आता भाजप असे जवळपास सर्वच पक्ष बदलून झालेले मुरजी पटेल भविष्यात पुन्हा कोणता पक्ष निवडतील याची शास्वती स्थानिक भाजपाला देखील देता येणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील जवाबदारी मोठ्या प्रमाणावर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मनोज नायक यांच्यावर येथून ठेपली आहे. मागील महापालिका निवडणुकीत त्यांना शिवसेनेने स्वतः तिकीट देऊन केलेलं असताना देखील ते भाजपशी प्रामाणिक राहिले ही त्यांची जमेची बाजू आहे, ज्याचा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं