जम्मू: CRPF चा ताफा जात असताना पुन्हा कारमध्ये स्फोट, जीवितहानी नाही

जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला. महत्त्वाचं म्हणजे, कारमध्ये मोठा स्फोट झाला तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात होता. प्रसार माध्यमांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परंतु या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचं वृत्त आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
सीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला असावा असं वाटत नाही. सध्या तपास सुरु आहे.
Jammu & Kashmir: A blast has occurred in a car in Banihal, Ramban. More details awaited. pic.twitter.com/XpnzzlkOYF
— ANI (@ANI) March 30, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं