दक्षिण मध्य मुंबई: काँग्रेसच्या प्रचारात मनसे पदाधिकाऱ्यांची हेजेरी

मुंबई : दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात आज पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेसला सुखद धक्का दिला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ काढलेल्या संवाद फेरीमध्ये मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील कार्यकर्त्यांसह हजेरी लावली.
दादरमधील शिवाजी पार्क परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत एकनाथ गायकवाड संवाद साधण्यासाठी आले होते. हा कार्यक्रम अगोदरच जाहीर झाला होता. पण या प्रचार उपक्रमामध्ये मनसेचा सहभाग असेल याची माहिती कुणालाच नव्हती. गायकवाड यांचा प्रचार सुरू असताना त्यांच्यासोबत मनसेचे संदिप देशपांडेही सहभागी झाले. गायकवाड, देशपांडे आणि काँग्रेस – मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांची मते जाणून घेतली. अनेकांनी गायकवाडांना आशिर्वादही दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उघडपणे भूमिका जाहीर केली आहे. पण मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचाही निर्णय त्यांनी घेतला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीला मनसे पाठींबा देणार का ? याबाबत मनसेने अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नव्हती. पण संदीप देशपांडे काँग्रेसच्या प्रचारात दाखल झाल्यामुळे मनसे काँग्रेस-एनसीपीच्या प्रचारात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं