आम्ही “शहाचे” सैनिक वेडे करुन जिवाचे रान: मनसेचा सेनेला टोला

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान या सोहळ्यासाठी मुंबईहून उद्धव ठाकरेही थेट गांधीनगर या ठिकाणी रवाना झाले. ज्यानंतर उद्धव ठाकरेंवर सर्व स्तरातून टीका जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख अचानक स्वबळावरून पलटले आणि मागील ५ वर्ष मोदी आणि अमित शहा यांना बोचऱ्या शब्दात लक्ष करणारे उद्धव ठाकरे सध्या त्यांच्यावर भलतेच फिदा असल्याचं जाणवतं.
तसेच मुंबईतील पूल दुर्घटनेनंतर मुंबई महानगर पालिकेत सत्तेत तसेच मुंबईमध्ये वास्तव्यास असून देखील उद्धव ठाकरे यांनी असंवेदनशीलपणा दाखवत ना मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली ना दरघटनेतील जखमींची हे सर्वश्रुत आहे. परंतु देशात आणि राज्यात टिकून राहण्यासाठी ते काही दिवस केवळ मोदी आणि अमित शहा यांची स्तुती करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळेच आता मनसेने देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी शिवसेना पक्षाच्या मुख्य गीताच्या पहिल्या ओळीच बदलून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. अफझल खानाचा फॉर्म भरण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख गुजरातला रवाना झाले अशीच टीका संदीप देशपांडे यांनी त्यांच्या पोस्टमधून केली आहे. उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे.
काय आहे संदीप देशपांडे यांची नेमकी पोस्ट?
आम्ही ‘शहाचे’ सैनिक वेडे, करून जिवाचे रान, चाललो गुजरातला भरायला ‘अफझल खानाचा’ फॉर्म..! अशी ही पोस्ट आहे. आपल्याला ठाऊक आहे की गेल्या पाच वर्षात युतीची अवस्था एकमेकांमधून विस्तव जात नाही अशीच होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर टीका करताना अफझल खानाची फौज अशी उपमा दिली होती. हाच संदर्भ घेऊन मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
आम्ही “शहाचे” सैनिक वेडे करुन जिवाचे रान,
चाललो आम्ही गुजरातला भरायला
“अफजलखानाचा”
फाॅर्म..— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 30, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं