राऊतांची शिष्टाई कामी नाही आली, जगताप - बारणेंतील वाद मिटेना, पार्थ पवारांना फायदा

पुणे: मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यादरम्यान समझोता करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही शिष्टाई कामी आली नसल्याचे वृत्त आहे. लक्ष्मण जगताप यांनी खासदार बारणेंचे काम करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे कळते. त्यामुळे मावळातील शिवसेनेचा उमेदवार धोक्यात तर एनसीपीचे उमेदवार पार्थ पवार यांचा मात्र फायदा होणार आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे चिंचवडमधील विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वाद तब्बल दहा वर्ष कायम आहे. त्यात भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर जगताप युतीचा अजिबात प्रचार करताना दिसत नाहीत. याबाबत शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनीही काही दिवसापूर्वी आमदार जगताप यांच्याशी चर्चा केली होती. परंतु, जगताप काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यानंतर बारणेंनी थेट खासदार संजय राऊत यांना लक्ष घालण्याची विनंती केली.
त्यानुसार संजय राऊत शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले. वाकडमधील एका बड्या हॉटेलात आमदार जगताप यांना बोलवून बारणेंसोबतचे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी नीलम गो-हे या सुद्धा उपस्थित होत्या. मात्र, जगताप यांनी बारणेंच्या तक्रारीचा पाढा राऊतांसमोर मांडला. माझ्यावर त्यांनी वेळोवेळी आरोप केले. मी शिवसेनेचा उमेदवार बदला, असे सांगितले होते. अजूनही उमेदवार बदला मी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणतो अशी आक्रमक भूमिका जगताप यांनी कायम ठेवली. जगताप काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात येताच राऊत यांनी तेथून काढता पाय घेतला.
भाजप आमदार जगताप यांनी प्रथम मावळची जागा भारतीय जनता पक्षाला सोडावी यासाठी हट्ट धरला. मात्र, राज्याच्या व्यापक हितासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसमोर नमते घेत २०१४ साली शिवसेनेने जिंकलेल्या सर्व जागा त्यांना देण्याचा निर्णय घेतला. शिवाय पालघरची एक वाढीव जागाही देऊन टाकली. यामुळे मात्र, जगताप यांचा हिरमोड झाला. २०१४ साली त्यांनी शेकाप-मनसेच्या मदतीने अपक्ष लोकसभा लढवून बारणेंना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदी लाटेत बारणेंनी दीड लाखांनी विजय मिळवला. परंतु, त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आता लक्ष्मण जगताप यांना चालून आल्याने ते कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असंच चित्र आहे. त्यामुळे जगताप यांचा बारणे विरोध हा पार्थ पवार यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तर नाही ना याची चर्चा पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू आहे. भाजपनेही आमदार जगताप यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं