नेपाळमध्ये अतिवृष्टीमुळे २७ जणांचा मृत्यू तर ४०० जण जखमी

काठमांडू : नेपाळला सध्या अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४०० पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हिमालयन टाइम्सच्या वृत्तानुसार नेपाळच्या दक्षिण जिल्ह्याला प्रचंड प्रमाणात वादळाचा फटका बसला आहे. परसा येथे वादळाच्या तडाख्यामध्ये अनेकांचे जीव गेले असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची भिती जिल्हा पोलीस कार्यालयाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, आतापर्यंत २७ लोकांना आपला जीव गमवावा लागला असून ४०० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बारा आणि परसा या दोन जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे.
नेपाळी लष्कराचे प्रवक्ते याम प्रसाद ढाकल यांनी सांगितले आहे की, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी २ एमआय १७ हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आलं आहे. शंभर पेक्षा अधिक टीम पूरग्रस्त भागात कार्यरत आहेत.. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत तसेच मृतांच्या परिवाराबद्दल दुख: व्यक्त केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं