मुरजी पटेल-केसरबेन पटेल यांच्यासहित ५ नगरसेवकांवर जातीच्या दाखल्या अभावी राजकीय गंडांतर?

मुंबई : जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील एकूण पाच नगरसेवकांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजज मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल जाहीर देणार आहेत. त्यामुळे इतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना ३, कॉंग्रेस १ आणि समाजवादी पक्षाच्या १ उमेदवारांना नगरसेवकपदाची मोठी लॉटरी लागू शकते असं म्हटलं जात आहे. दरम्यान, आता थोड्या वेळातच निकाल अपेक्षित आहे.
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ६७ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ७६ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वीच फेटाळले होते. दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयाला यासर्व संबंधित नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.
त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या ५ उमेदवारांना नवीन वर्षाची अनोखी भेट मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २८-मध्ये एकनाथ हुंडारे (शिवसेना), प्रभाग क्रमांक ६७ मध्ये प्राची परब ( शिवसेना), प्रभाग क्रमांक -७६ मध्ये नितीन बंडोपंत सलाग्रे ( काँग्रेस), प्रभाग क्रमांक -८१ मध्ये संदीप नाईक ( शिवसेना), प्रभाग क्रमांक ९० मष्ये बेनीडिट किणी ( समाजवादी पार्टी) यांना ही संधी मिळणार आहे.
दरम्यान काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ३२ च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद गेल्या १८ डिसेंबरला मुंबई हायकोर्टाने रद्द केल होतेे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभाग क्रमांक ३२ च्या शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना देखिल पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९३,भाजपा ८५, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, समाजवादी ६, एमआयएम २ आणि मनसे १ असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं