उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी - नारायण राणे

रत्नागिरी : कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांचा निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर नारायण राणे यांनी जाहीर सभेत शिवसेनेवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत शिवसेनेने निवडणूक लढवली आणि स्वत:चा फायदा करुन घेतला. सलग ५ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने शिवसेनेनी टीका केली. टीकेशिवाय काहीच केलं नाही. युतीत सडेपर्यंत कशाला राहिलात? अमित शहांना अफजल खान म्हटलं आणि परवा त्यांचाच फॉर्म भरायला गांधीनंगरला गेले. शिवसेनेची प्रवृत्ती विकृत आहे. उपकार घ्यायचे, सत्तेचा फायदा उचलायचा हे शिवसेनेचं दुटप्पी धोरण असल्याचं राणे यांनी सांगितले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं