शिवसेना पक्ष अल्पसंख्याकांविरोधात आहे: मिलिंद देवरा

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असताना मुंबई काँग्रेसने देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना अल्पसंख्याकांविरोधात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. काही वर्षांपूर्वीच शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा अपमान केला होता याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली. आता मतदानातून त्यांना चांगलाच धडा शिकवा, असे जाहीर आवाहन देवरा यांनी जैन समाजाला केले आहे.
मिलिंद देवरा हे मंगळवारी मुंबई सराफ बाजार संघटनेच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेचा अल्पसंख्याकांना विरोध राहिला आहे. काही वर्षांपूर्वी पर्यषूण पर्वाच्या काळात त्यांनी जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा अपमान केला आहे. हे सर्व मतदान करताना लक्षात ठेवा. मतदानाच्या माध्यमातूनच त्यांना धडा शिकवता येईल.
दरम्यान, संजय निरुपम यांना पदावरुन हटवून काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांना मुंबई काँगेसचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर ते दक्षिण मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं