Mufin Green Finance Share Price | अल्पावधित 1076 टक्के परतावा देणारा शेअर स्वस्त होणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घेणार का?

Mufin Green Finance Share Price | ‘मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड’ या स्मॉल कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २:१ या प्रमाणात शेअर विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी या कंपनीचे शेअर २५९ रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल ६५१.५४ कोटी रुपये आहेत. ही कंपनी मुख्यत: वित्त सेवा क्षेत्रात नॉन बँकींग वित्तीय कंपनी म्हणुन काम करते. कंपनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज देते. कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी २:१ या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याचा प्रस्ताव मंजुर केला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Mufin Green Finance Share Price | Mufin Green Finance Stock Price | BSE 542774)
कंपनीचे स्पष्टीकरण :
‘मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक विभाजनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्या शेअरचे दर्शनी मुल्य १ रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की, स्टॉक स्प्लिट करण्याचे कारण म्हणजे, शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना आपल्या कंपनीचे अधिक स्वस्त आणि परवडणारे वाटावे यासाठी कंपनी हा शेअर विभाजनाचा निर्णय घेतला आहे.
शेअरची कामगिरी :
‘मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेसनमध्ये २५८.९० रुपये किमतीवर क्लोज झाले होते, जे मागील ट्रेडिंग सेशनमधील २६२.५५ रुपये किमतीच्या तुलनेत १.३९ टक्के घसरले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत १८.९५ रुपये वरुन वाढुन सध्याच्या किमतीवर आली आहे. या कालावधीत स्टॉकने आपल्या शेअर धारकांना १०७६.८२ टक्के परतावा कमावुन दिला आहे. मागील तीन वर्षात या शेअरची किंमत १६.५० रुपयेवरुन १६१४.५७ टक्के वाढली आहे. या काळात शेअर धारकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून बक्कळ कमाई केली आहे.
मागील सहा महिन्यात हा स्टॉक ७८.६२ टक्के वाढला असुन २०२३ या नवीन वर्षात स्टॉक १०.९७ टक्के वधारला आहे. या स्टॉकने २५-१०-२०२३ रोजी २८६.८० ही आपली ५२ आठवड्याची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर ०२-०३-२०२२ रोजी या स्टॉकने आपली ४८.३५ रुपये ही निचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. चालु आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीमध्ये प्रमोटरची शेअर होल्डिंग ५८.१८ टक्के होती, तर किरकोळ गुंतवणुकदारांची शेअर होल्डिंग ४१.८२ टक्के होती. आज सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी या कंपनीचे शेअर्स ०.०५८ टक्के वाढीसह २५९.०५ रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Mufin Green Finance Share Price 542774 stock market live on 20 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं