राहुल गांधी यांच्या रोड शोला तुफान जनसागर

कलपेट्टा : केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत येथे गुरुवारी केलेल्या रोडशोला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळाला. दरम्यान या रोड शोमध्ये केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नितेला यांची देखील विशेष उपस्थिती होती. तसेच या रोडशोदरम्यान काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. राहुल आणि प्रियांका गांधी जनतेला अभिवादन करत होते. राहुल गांधी यांनी रोड शोमध्ये सामील झालेल्या अनेकांशी पुढे येऊन हस्तांदोलन केले.
राहुल व प्रियांका यांची छबी उपस्थित लोकं मोबाईल कॅमेऱ्याने टिपताना दिसत होते. विशेष म्हणजे या रोड शोमध्ये काँग्रेस आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग या दोन्ही पक्षांचे झेंडे देखील फडकताना दिसत होते. राहुल गांधी यांनी जिथे उमेदवारी अर्ज दाखल केल्या त्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारच्या कार्यपद्धतीमुळे दक्षिण भारतातील संस्कृती, भाषा, इतिहास यांना धोका निर्माण झाल्याची भावना जनतेमध्ये आहे.
देशभरातीर जनतेला आश्वस्त करण्यासाठीच मी उत्तर व दक्षिण भारतातून एकाचवेळी लोकसभा निवडणूक लढवत आहे. राहुल गांधी हे अतिशय निर्भय आहेत, वायनाडच्या जनतेने त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी नंतर ट्विटरवरून केले. प्रियांका यांनी म्हटले आहे की, माझा भाऊ हा माझा विश्वासू मित्र देखील आहे. ते वायनाडमधील मतदारांचा अपेक्षाभंग करणार नाहीत. वायनाडमधून राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे डावे पक्ष प्रचंड संतापले असून, त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र त्याबाबत राहुल म्हणाले की, त्यांनी माझ्याविरुद्ध प्रचार केला वा टीका केली तरी आपण मात्र डाव्या पक्षांवर अजिबात टीका करणार नाही अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं