नवरदेवाचं लग्नाच्या पत्रिकेतून मोदींना मतं देण्याचं आवाहन; निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना भाजप आणि मोदी सार्थक देखील निरनिराळे फंडे अंमलात आणत आहे. त्याचाच भाग म्हणजे एका मोदी समर्थकाने स्वतःच्या लग्न पत्रिकेवर नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आणि लग्न गडबडीतच निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडला आहे. सदर इसम हा नगरचा असून फिरोज शेख असं त्याच नाव आहे. सुजय विखेंना मतदान करण्याचं त्याने लग्न पत्रिकेद्वारे आवाहन केलं होतं.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतःच्या लग्न पत्रिकेचा वापर करणं मोदी समर्थकाला महागात पडलं आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याला नोटीस देखील बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे असे फंडे याआधी देखील अनेकांनी केले असून, त्याला समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळाल्याने अनेकांनी तोच कित्ता गिरवल्याचे पाहायला मिळाले.
त्यामुळे भर लगीन सराईच्या धामधुमीत नवरदेव कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. लग्न ठरलं आणि प्रसिद्धीसाठी नकोतो स्टंट केला खरा, पण स्वतःसोबत कुटुंबाची देखील डोकेदुखी वाढवली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं