त्या चुकीसाठी पार्थला फासावर लटकवणार का? अजित पवार

पूर: माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दम, एनसीपीचे नेते अजित पवार यांनी एनसीपीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना भर सभेत दिला.
राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंच्या प्रचाराच्या निमित्ताने काल माळशिरस येथे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर टोलेबाजी करताना ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखेवरही घसरले. दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी पुत्र आणि मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी चर्चमध्ये जाऊन वादग्रस्त फादरच्या घेतलेल्या भेटीवरही भाष्य केलं.
पार्थने चर्चमध्ये जाऊन दर्शन घेणे हे फासावर लटकवण्यासारखी चूक नाही. अशी चूक माझ्याकडून घडली असती तर गोष्ट वेगळी होती. प्रसार माध्यमांनी एवढा मोठा बाऊ करण्याची गरज नव्हती. तो अजून नवखा आहे. त्याला मी चार गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी त्याला चर्चमध्ये नेले होते. तो स्वत: गेला नव्हता, असे म्हणत अजित पवारांनी आपल्या मुलाची पाठराखण केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं