सत्ताकाळात शिवसेना-भाजप खासदारांची संपत्ती ६० टक्क्यांनी वाढली

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १०६ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे समजते. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ३.२० कोटींची वाढ झाली आहे. ADRच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१४ आणि २०१९ मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.
एकूण ७ मतदारसंघात महाराष्ट्र इलेक्शन वॉच अॅण्ड असोसिशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्सनं ११६ पैकी ११५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केलं. त्यानंतर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांपैकी ३३ टक्के उमेदवार कोट्याधीश आहेत. त्यांची मालमत्ता सरासरी दोन कोटी ३५ लाख रूपये आहे. १९ उमेदवारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दहा गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत.
एडीआरच्या अहवालामध्ये ११५ पैकी ३३ उमेदवार कोट्याधीश असल्याचं म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यातील ११५ उमेदवारांची सरासरी मालमत्ता २.३५ कोटी रूपये आहे. तर, भारतीय जनता पक्षाच्या ५ उमेदवारांची सरासरी मालमत्ता १८.९९ कोटी रूपये तर, शिवसेनेच्या २ खासदारांची सरासरी मालमत्ता ९.६२ कोटी रूपये आहे. यामध्ये १० उमेदवारांनी आपले पॅन घोषित केलेले नाही. तर, ११५ पैकी ११ उमेदवारांनी उत्पन्नाचे स्त्रोत घोषित केलेले नाहीत. दरम्यान, प्रतिज्ञापत्रामध्ये ४८ उमेदवारांनी प्राप्तिकर विवरण घोषित केलेले नाही. या अहवालानुसार विद्यमान सहा खासदारांची २०१४ची मालमत्ता ५.३७ कोटी रूपये आहे. तर, २०१९मधील त्यांची मालमत्ता ही ८.५७ कोटी रूपये आहे. सारी आकडेवारी पाहिल्यानंतर शिवसेना – भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी साठ टक्के वाढ झाली आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संपत्तीवरून जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचवेळी ही आकडेवारी समोर आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं