OnePlus Pad | वनप्लस पॅडचे जबरदस्त फीचर्स समोर आले, 9510 एमएएच बॅटरीसह लवकरच लाँच होणार

OnePlus Pad | वनप्लसने गेल्या महिन्यात भारतासह जागतिक बाजारपेठेत आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. याशिवाय चिनी कंपनी आपल्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनबाबतही चर्चेत आहे. एक नवीन लीक समोर आला आहे, ज्यानुसार ब्रँड आपला फ्लॅगशिप टॅबलेट वनप्लस पॅड लवकरच बाजारात लाँच करणार आहे. हा वनप्लस टॅबलेट सर्टिफिकेशन वेबसाइट गीकबेंचवर पाहायला मिळाला आहे. या आगामी टॅबलेटच्या प्रोसेसरसह अनेक माहिती सर्टिफिकेशन साईटवर समोर आली आहे.
गीकबेंचवरील हा वनप्लस टॅबलेट ओपीडी २२०३ या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. कंपनी हा टॅबलेट पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये अनेक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करू शकते. या टॅबलेटच्या लीक झालेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात मीडियाटेकचा फ्लॅगशिप प्रोसेसर डायमेंसिटी 9000 मिळेल. याशिवाय टॅब्लेटमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिमचा सपोर्ट करता येऊ शकतो. वनप्लस पॅडला गीकबेंचवर सिंगल कोरमध्ये ८९७ गुण मिळाले आहेत. तर या डिव्हाइसला मल्टी-कोरमध्ये 3190 पॉईंट्स देण्यात आले आहेत.
फीचर्स (संभाव्य)
या वनप्लस टॅबलेटचे काही फीचर्स याआधीही समोर आले आहेत. यात ११.६ इंचाचा मोठा एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो, जो १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या टॅबलेटचा डिस्प्ले एफएचडी + रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. यात २८०० बाय २००० पिक्सल रिझोल्यूशनचा डिस्प्ले मिळेल, जो ५०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करू शकतो. याशिवाय टॅब्लेटचा डिस्प्ले डॉल्बी व्हिजन सर्टिफाइड असेल.
वनप्लसचा हा टॅबलेट ८ जीबी आणि १२ जीबी अशा दोन रॅम ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. यात मीडियाटेक डायमेंसिटी ९००० प्रोसेसर तसेच ९,५१० एमएएचची मोठी बॅटरी मिळणार आहे. या टॅब्लेटमध्ये ६७ वॉट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग फीचर दिले जाऊ शकते.
कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या टॅब्लेटच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. वनप्लसचा हा टॅबलेट याच महिन्यात लाँच होऊ शकतो. मात्र ब्रँडकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: OnePlus Pad specifications viral on internet check details on 02 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं