उज्वला योजनेतील सिलिंडर परवडेना, ४ राज्यात ८५ टक्के लाभार्त्यांची चुलीला पसंती

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने आपल्या महत्वकांक्षी योजनांच्या यशाचा पाढा मोठी जाहिरातबाजी करत सुरू केला होता. यामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजनेचा देखील समावेश आहे. दरम्यान, या योजनेवरुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘द हिंदू’ ने दिलेल्या अधिकृत वृत्तानुसार मोफत एलपीजी गॅस जोडणी झालेल्या ४ राज्यातील सुमारे ८५ टक्के लाभार्थी अजूनही चुलीवर स्वयंपाक बनवत असून त्यांना संपलेला सिलिंडर पुन्हा घेणे परवडत नसल्याचे देखील समोर आलं आहे.
या वृत्तानुसार, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उज्वला योजनेचे ८५ टक्के लाभार्थी अजूनही चुलीवर स्वयंपाक करत आहेत, असे रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर कॅम्प्समेंट इकॉनॉमिक्सच्या (आरआयसीई) अहवालात ही बाब समोर आली आहे. यामागे आर्थिक कारणांबरोबर लैंगिक असमानता असल्याचेही समोर आले आहे.
चुलीवर स्वंयपाक करताना त्यातून निघणाऱ्या धुरामुळे नवजात बालकांचा मृत्यू, बालकांच्या वाढीत अडचणी त्याचबरोबर ह्दय आणि फुफ्फुसाच्या आजारांची भीती असते. हा सर्वे २०१८ च्या अखेरीस करण्यात आला आहे. यामध्ये ४ राज्यातील ११ जिल्ह्यातील १५५० कुटुंबीयांचे यादृच्छिक (रँडम) नमुने घेण्यात आले. या परिवारातील ९८ टक्क्यांहून अधिक घरात चुल आढळून आली होती. उज्वला योजनेचे लाभार्थी अत्यंत गरीब असल्यामुळे त्यांना सिलिंडर संपल्यानंतर तो पुन्हा विकत घेणे परवडत नाही, असे देखील सर्वेक्षणात स्पष्ट म्हटले आहे.
त्याचबरोबर लैंगिक असमानतेची बाबही समोर आली आहे. सुमारे ७० टक्के कुटुंबीयांना चुलीसाठी लागणाऱ्या सरपणावर काहीच खर्च करावा लागत नाही, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. सिलिंडरच्या तुलनेत त्यांना चुल स्वस्त पडते. महिला शेणाच्या गोवऱ्या थापतात तर पुरुष लाकडे कापून आणतात.
बहुतांश लोकांना गॅसवर स्वंयपाक बनवणे सोपे वाटते. पण चुलीवर स्वंयपाक चांगला शिजतो, विशेषत: चपाती, भाकरी, रोटी चुलीवर चांगली होते. गॅसवर स्वंयपाक केल्यास पोटात गॅस बनतो, अशी ग्रामीण भागातील महिलांची धारणा आहे. त्यामुळे उज्वला योजनेबाबत जागरुकता वाढवण्यावर जोर देण्यास या अहवालात सुचवले आहे. उज्वला योजना २०१६ मध्ये सुरु झाली होती. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबाना मोफत गॅस सिलिंडर, रेग्युलेटर आणि पाइप दिले जाते. सरकारी आकडेवारीनुसार या योजनेच्या माध्यमातून ६ कोटी कुटुंबीयांना गॅस जोडणी दिलेली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं