Credit Card Charges | क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्वाचं, 'ही' शुल्क भरावी लागणार, किती ते पहा

Credit Card Charges | आजच्या काळात क्रेडिट कार्ड हे एक उत्तम आर्थिक साधन बनले आहे. गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डधारकांना कोणतीही अडचण न येता एका मर्यादेपर्यंत पैसे सहज मिळतात. ग्राहकांना अनेक सुविधा देणारे क्रेडिट कार्ड आपल्यासोबत खूप जबाबदारीही घेऊन येते. जाणून घेऊया क्रेडिट कार्डधारकांना वेळोवेळी कोणते शुल्क भरावे लागते.
मेंटेनेंस चार्ज
बँकिंग तज्ज्ञ म्हणतात, “क्रेडिट कार्ड वापरताना अचानक चार्ज द्यावा लागला तर काळजी करण्याची गरज नाही. यातील अनेक शुल्क तुम्हाला लागूही होत नाही. अशावेळी तुम्ही हे शुल्क सहज टाळू शकता. मायफंड बझारचे तज्ज्ञ सांगतात की, अनेक कार्ड्सना पहिल्या ३६५ दिवसांसाठी जॉईनिंग फी भरावी लागत नाही. पण त्यानंतर हे शुल्क आकारले जाऊ लागते. अशा वेळी क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी ग्राहकांनी क्रेडिट कार्डवरील मेंटेनन्स चार्ज एक वर्षासाठी मोफत आहे की लाइफटाइम फ्री हे तपासून पाहावे.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाते
जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी करत असाल तर तुम्हाला काही शुल्क भरावे लागू शकते. आपल्या क्रेडिट कार्ड करारामध्ये याचा उल्लेख आहे. विनीत सांगतात की क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्हाला पैसे काढण्याच्या रकमेच्या जास्तीत जास्त 2.5 टक्के रक्कम भरावी लागू शकते.
लेट पेमेंट चार्जेस
उशीरा पैसे भरल्यास दंड भरावा लागू शकतो. जर ग्राहकाने आधीच ठरवून दिलेली किमान मासिक रक्कम भरली नाही तर त्याला अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
जीएसटी शुल्क
प्रत्येक क्रेडिट कार्डवर जीएसटी आकारला जातो. क्रेडिट कार्डपेमेंट १८ टक्क्यांच्या जीएसटीच्या कक्षेत येतात.
परदेशातील व्यवहारांवर शुल्क
बहुतेक क्रेडिट कार्ड आपल्याला परदेशात देखील पैसे भरण्याची परवानगी देतात. पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पेमेंटवर शुल्क भरावे लागणार आहे. परदेशात क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना 3 टक्क्यांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Credit Card Charges applicable check details on 29 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं