बुलेट ट्रेनसाठी निसर्गाचा विध्वंस! ५३,४६७ खारफुटींच्या कत्तलीस परवानगी

मुंबई : बुलेट ट्रेनसाठी ठाणे, नवी मुंबई व पालघर या पट्ट्यात तब्बल १३.३६ हेक्टर जागेवर पसरलेल्या एकूण ५३,४६७ खारफुटींची कत्तल करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्रालयाने (एमओईएफ) परवानगी दिल्याची अधिकृत माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन (एनएचएसआरसी)ने स्वतः हायकोर्टाला सोमवारी दिल्याचे वृत्त आहे.
एमओईएफने दिलेल्या परवानगीमुळे आता हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनकडे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या असल्याचा दावा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने केला आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए)ने सात मार्च रोजी एनएचएसआरसीएलचा खारफुटी तोडण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. एमसीझेडएमएने केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रानुसार, मुंबई ते ठाणेदरम्यान ३२.४३ हेक्टर जागेवर पसरलेले कांदळवन या ठिकाणाहून हटवावे लागेल.
एमसीझेडएमएने बुलेट ट्रेनसाठी कांदळवन नष्ट करण्यास नकार दिल्याने एनएचएसआरसीएलने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेच्या सुनावणीत वरील माहिती हायकोर्टाला देण्यात आली. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर या पट्ट्यातील खारफुटी हटविण्यासाठी एनएचएसआरसीएलने एमसीझेडएमला अर्ज केला. परंतु, २२ डिसेंबर २०१८ रोजी प्राधिकरणाने एनएचएसआरसीएलचा अर्ज फेटाळला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं