भाजप युवा मोर्च्याच्या वतीने भव्य युवा-महोत्सव २०१९ साजरा, अनेक मान्यवरांची उपस्थिती

मुंबई : अंधेरी पूर्व येथे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने भव्य युवा महोत्सव २०१९ साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई विभागातील अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान, या युवा महोत्सवाचे आयोजन एस. के. बंजारा फाउंडेशन आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले होते.
दरम्यान, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आणि त्यांच्या कला गुणांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला. विविध प्रकारातील एकूण १५ क्षेत्रातील तब्बल १२० नामांकनं यासाठी आली होती. त्यातील अंतिम पात्र मान्यवरांना इंडियन आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न एस. के. बंजारा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच अंधेरी विधानसभा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मनोज नायक आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.
समाजातील चांगलं काम करणाऱ्या आणि विविध कला गुणांना जोपासून त्यात भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांना विविध सामाजिक उपक्रमातून प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न एस. के. बंजारा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नायक मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्वेतील सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि सामन्यांमध्ये भाजपचा आदर असलेला चेहरा म्हणून त्यांचा परिचय झाला आहे. एकूणच अंधेरी पूर्वेतील भाजप सर्वच थरातील सामान्य लोकांशी जोडून पक्ष मजबूत करण्याचा देखील त्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे आणि त्याला स्थानिकांचा देखील चांगला पाठिंबा मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं