भाजप आमदाराने विंग कमांडर अभिनंदन यांना दिली चंदन तस्कराची उपमा

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा आखाडा प्रचार सभांनी तापला असताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरीदेखील एकमेकांवर झाडल्या जात आहेत. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी मात्र विकासापेक्षा भारतीय सैनिकांच्या शौर्याचा अधिक वापर करून मतांचा जोगवा मागितला जात आहे. परंतु त्या नादात भाजपची नेते मंडळी सैनिकांचाच अपमान वारंवार करताना दिसत आहेत.
तसाच काहीसा प्रकार पुन्हा औरंगाबादमध्ये प्रचार सभेत अनुभवण्यास मिळाला. कारण भाषणाच्या नादात भाजपचे नेते सुरेश धस यांची जीभ घसरली. पाकिस्तानच्या तावडीतून परतलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं कौतुक करताना सुरेश धस यांनी बोलण्याच्या नादात अभिनंदन यांना थेट विरप्पनची उपमा दिली. नंतर लागलीच चूक लक्षात आल्यावर त्यांनी सारवासारव केली आणि दिलगिरीही व्यक्त केली.
खरं तर अभिनंदनच्या दाढीमिशांचं कौतुक करताना त्यांनी हा शब्द वापरला. पण एकदा तोंडातून निघालेला शब्द परत येत नाही. त्यामुळे सुरेश धस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. प्रचार करताना जिभेवर कसा ताबा ठेवायला हवा याचं भान नक्कीच राजकारण्यांनी बाळगायला हवं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं