लोकसभे दरम्यान यूपीत फटका बसू नये म्हणून अल्पेश ठाकोर यांचा भाजपप्रवेश लांबणीवर?

गांधीनगर : आज ११ एप्रिल म्हणजेच गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी अल्पेश ठाकोरने राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा झटका दिला. गुजरातमधील ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून परिचित असलेले अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली असली तरी त्यांच्या समर्थकांनी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
दरम्यान, गुजरातमध्ये एकही महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर त्यातील आरोपी हा उत्तर भारतीय असल्याचं समजताच संपूर्ण गुजरातमध्ये उत्तर भारतीय समाजावर जोरदार जीवघेणे हल्ले झाले होते. इतकंच नव्हे तर लाखो उत्तर भारतीयांनी गुजरातमधून पलायन केलं होतं. मात्र त्यानंतर संबंधित हल्ल्यामागे ठाकोर समाजाचा प्रतिनिधी आणि काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांचा हात असल्याचं निष्पन्न झालं होतं, ज्याचा त्यांनी स्वतः इन्कार करत हात झटकले होते. त्यानंतर उत्तर भारतीयांमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला होता.
दरम्यान, तीच बाब लक्षात घेऊन भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून अल्पेश ठाकोर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर टाकला असून लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा अधिकृत प्रवेश करून घेतला जाईल असं म्हटलं जात आहे. तसेच गुजरातमध्ये ते छुप्प्या पद्धतीने भाजपाला लोकसभेत मदत करतील असं म्हटलं जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं