२००४ व २०१४ मध्ये शपथपत्रात शिक्षण पदवीधर; तर २०१९ मध्ये पदवीधर नाही?

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण, त्यांची पदवी नेहमीच वादात आणि चर्चेचा विषय राहिली. ५ वर्षांपूर्वी इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून गदारोळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपण परदेशातील येल विद्यापठातून ग्रॅज्युएट असल्याचं स्मृती यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु आता लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण न केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद करत स्वतःच्या पदवीचा वाद कायमचा संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
आपण दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून बीकॉमची प्रथम वर्षाची परीक्षा दिली. परंतु, ३ वर्षांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंच नाही, अशी माहिती इराणी यांनी शपथपत्रातून नमूद केली आहे. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण न केल्याची माहिती खुद्द इराणी यांनी दिल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. इराणी यांनी २००४ आणि २०१४ मध्ये निवडणूक अर्ज दाखल करताना वेगवेगळी माहिती दिली होती. त्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर शिक्षणावर टीका झाली होती.
२००४ मध्ये इराणी यांनी चांदणीचौक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळो आपण बीए’पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली होती. दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून आपण बीए केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केलं होतं. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं