VIDEO: संरक्षण करार, अनिल अंबानी रशियाच्या दौऱ्यात देखील मोदींसोबत होते

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांसच्या कंपनीसोबत राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याची घोषणा केली. कालांतराने अनिल अंबानी आणि राफेल करारावरून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले. सुरक्षाविषयक महागड्या सौद्यांमध्ये केवळ फ्रान्स नसून रशियासोबत देखील एस-४०० मिसाईल डिफेन्स यंत्रणेसाठी तब्बल ४०,००० कोटींचा करारवर ऑक्टोबर २०१८ मध्ये अधिकृतपणे स्वाक्षऱ्या झाल्या जेव्हा रशियाचे पंतप्रधान २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. मात्र तत्पूर्वी २४ डिसेंबर २०१५ मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेले होते आणि विशेष म्हणजे त्यात देखील अनिल अंबानी यांचा समावेश होता. त्यात भर म्हणजे रशियन प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी देखील अनिल अंबानींचा होते हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि काही अंतरावर स्वतः नरेंद्र मोदी देखील उपस्थित विराजमान असल्याचे दिसत होते. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांनी देखील राफेल सौंदयापूर्वी फ्रान्सचा दौरा केल्याच्या बातम्या फ्रान्समधील प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ऑक्टोबर २०१८ मध्ये २ दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम खरेदी कराराच्या दृष्टीने पुतिन यांचा हा भारत दौरा महत्वाचा असल्याचं म्हटलं गेलं होतं. भारतीय हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारत रशियाकडून ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करारावर भारतीय अधिकारी आणि रशियन अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे स्वाक्षऱ्या करून अंतिम स्वरूप दिलं होतं. प्रत्यक्षात एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम खरेदी करारासंबंधित अनिल अंबानींच्या कंपनीचा काही सहभाग असल्याचं कोणताही वृत्त नसलं तरी त्याची त्यावेळची रशियातील अनिल अंबानींची मोदींसोबतची हजेरी पुन्हा समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनली आहे.
विशेष म्हणजे ज्या सौदी अरेबिया, फ्रांस आणि रशिया अशा देशांसोबत भले मोठे करार होत आहेत, नेमके त्याच देशांकडून मोदींना निवडणुकीच्या तोंडावर पुरस्कार जाहीर होत आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे संबंधित पुरस्कारांची संबंधित वेगवेगळी कारण ज्यामुळे पुरस्कार दिला जातो ते कोणालाही समजू शकलेलं नाही आणि त्यामुळे समाज माध्यमांवर या विषयांनी तोंडावर काढल्याचे पाहायला मिळत आहे.
काय आहे तो नेमका अनिल अंबानींच्या रशियातील विशेष उपस्थितीचा;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं