मोदीजी पाकबद्दल नाही तर भारताविषयी बोला : प्रियंका गांधी

फतेहपूर सिक्री : भारतीय जनता पक्षाचे नेते फक्त स्वत:लाच राष्ट्रवादी आणि देशाप्रती प्रेम असणारी मंडळी समजतात. ते खरे असेल, तर देशातील साऱ्या शहीद जवानांचा सन्मान करावा. जर ते राष्ट्रवादी असतील तर लोकसभा निवडणुकांच्या काळात केवळ पाकिस्तानविषयी नव्हे, ता भारताविषयी बोलावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले. काँग्रेसचे स्थानिक उमेदवार राज बब्बर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारसभेत त्या उपस्थितांना संबोधित करत होत्या. या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मार्गदर्शन केले.
प्रियांका यांनी महिला, युवक, शेतकरी आणि जवानांसाठी काय केले, आणि काय करणार आहेत, याबाबत भारतीय जनता पक्षाने सांगितले पाहिजे, असे सांगून तुमच्या दारात उघड्या पायांनी आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही का भेटला नाही, त्यांची दु:खे का समजून घेतली नाहीत, असा प्रश्न प्रियांका यांनी विचारला.
नरेंद्र मोदी सरकारला लोकशाहीबद्दल ना अभिमान आहे, ना जनतेबद्दल. ते खरे राष्ट्रवादी असते तर त्यांनी केवळ सत्याचा मार्ग अंगीकृत केला असता, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. ज्यांनी ज्यांनी हक्क व अधिकार मागितला, त्यांना मारहाण केली गेली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही अनेक मोठ्या योजना कार्यान्वित करु, ज्याचा सामान्य जनतेला अधिक फायदा होईल. काँग्रेसने नेहमी जनतेचाच फायदा पाहिला, त्यांना वाचवले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं