Adani Group Shares | अदानी ग्रुपचे बाजार भांडवल घटले, शेअर्सची घसरगुंडी काही थांबेना, आतापर्यंत अदानी शेअर्स किती पडले?

Adani Group Shares | हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल प्रसिद्ध झाल्याच्या दोन महिन्यांनंतर गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये किंचित रिकव्हरी आली होती. मात्र स्टॉकमध्ये आज जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अदानी ग्रुपचे स्टॉक अजूनही अस्थिर असून आज सर्व शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन महिन्यात अदानी ग्रुपमधील कंपन्याचे शेअर्स निम्म्यावर आले आहेत. अदानी ग्रुप स्टॉकमध्ये सध्या गुंतवणूक करणे खूप धोक्याचे आहे, कारण सेबीने अदानी ग्रुपला अजून क्लीन चिट दिलेली नाही.
अदानी स्टॉकची कामगिरी :
चालू आर्थिक वर्षात ‘अदानी टोटल गॅस’ आणि ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअर्समध्ये 54 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पहायला मिळाली आहे. त्यापाठोपाठ ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 49 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत, तर ‘अदानी विल्मार’ कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. त्याच वेळी, ‘अदानी पोर्ट्स’ आणि ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनी शेअर्स अनुक्रमे 15 टक्के आणि 11 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तथापि ‘अदानी पॉवर’ या एकमेव कंपनीच्या शेअरमध्ये थोडीशी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. अदानी पॉवर स्टॉक 31 मार्च 2022 रोजी 185.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 4.21 टक्के घसरणीसह 184.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी स्टॉकच्या मार्केट कॅपवर प्रभाव :
मागील दोन महिन्यात ‘अदानी एंटरप्रायझेस’, ‘अदानी ग्रीन एनर्जी’, ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’, ‘अदानी पॉवर’, ‘अदानी टोटल गॅस’, ‘अदानी ट्रान्समिशन’ आणि ‘अदानी विल्मार’ या सात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 8.63 लाख कोटी रुपयेवर आले आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या कंपन्याचे एकूण बाजार भांडवल 13.20 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच अदानी समूहातील या सर्व कंपनीचे बाजार भांडवल 4.50 लाख कोटींनी कमी झाले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Group Shares has fallen down badly check details on 27 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं