सेना-भाजपला इशारा! मी अस्मितेचा प्रश्न करणार नाही, माझे कार्यकर्ते करतील: हितेंद्र ठाकूर

पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी दरम्यान जोरदार लढाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपने आयत्यावेळी निवडणूक चिन्हावरून केलेल्या राजकारणाला अनुसरून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून विरोधकांना इशाराच दिला आहे.
त्यात प्रतिक्रिया देताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे की, शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांपासून पदाधिकारी पालघरमध्ये वकिलांच्या फौजा घेऊन तळ ठोकून होते. त्यांनी केलेलं हे अत्यंत खालच्या पातळीवरील राजकरण आहे. नव्याने मिळालेलं चिन्ह देखील तितकंच लोकप्रिय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी ही निवडणूक अस्मितेची करणार नाही तर माझे सर्व कार्यकर्तेच हा अस्मितेचा विषय करतील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमचं चिन्ह रद्द करण्यासाठी शिवसेना-भाजपचे सर्व बेगाने शादी मे हे सगळे अब्दुल्ला येऊन बसलेले रात्र भर, असा घणाघात देखील त्यांनी यावेळी केला. आम्हाला देखील राजकारण कळत, पण त्यांची अक्कल तेवढीच असल्याचा चिमटा त्यांनी यावेळी शिवसेना-भाजपच्या मंत्र्यांना काढला.
तसलेच डहाणू पर्यंत ट्रेन, गावोगावी पाणी आणि वाढीव पाणी, ट्रान्सपोर्ट व्यवस्था आणि रस्ते अशी कामं आम्ही केली आहेत. पण यातील भाजप-शिवसेनेने काय केलं इथल्या लोकांसाठी असा प्रश्न देखील आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी उपस्थित करत विरोधकांना विकासाच्या मुद्यावर धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. पुढे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजप-शिवसेनेला खुले आव्हान देत एकाच व्यासपीठावर येऊन स्वतःची विकास कामं सांगा आणि आम्ही आमची विकास कामं लोकांना जाहीरपणे सांगतो, अशी प्रतिक्रया दिली आणि विरोधकांना विकासाच्या मुद्दयांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे बहुजन विकास आघाडी, आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या शक्तीनिशी लोकसभेच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित झालं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने पालघरच्या दौऱ्यावर आले होते. मात्र त्यांना स्थानिकांचा अल्पप्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर बहुजन विकास आघाडीची ताकद लक्षात घेता युतीतील मंत्र्यांनी एकत्र येत बहुजन विकास आघाडीच्या निवडणूक चिन्हावरून आयत्यावेळी राजकारण केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजप-शिवसेनेबद्दल प्रचंड संताप निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, नवं निवडणूक चिन्ह देखील सुसाट जाईल असा विश्वास देखील आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.
व्हिडिओ: आमदार हितेंद्र ठाकूर यांची संपूर्ण प्रतिक्रिया;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं